पोस्ट्स

मार्च १९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रफी साहब, आपने मराठी को किरणे खूबसूरत चांद , दिये मान गये !

इमेज
 दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.काही कामानिमित्त पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रोने प्रवास करत होतो. वेळ दुपारची असल्याने फारशी गर्दी नव्हती. माझ्या शेजारीच एक सत्तरीचे आजोबा प्रवास करत होते. आजोबानी मेट्रोच्या संगीताच्या नियमाला बगल देत हेडफोन न वापरता, मोबाईलवर गाणी लावली होती. त्यामुळे त्या गाण्याच्या आस्वाद मला देखील घेता आला. आजोबानी शोधिसी मानव लावुनी अंतरी,  प्रभू तू दयाळू कृपावंत  दाता, हा छंद जीवाला लावी पिसे, हा रुसवा सोड सखे, हे मना आज कोणी बघ तुला या सारखी गाणी आपल्या मोबाईलवर लावली होती  आजोबांची गाणी शांत संगीताची आणि सहज गुणगुणता येतील या प्रकारच्या मराठी भाषेतील असल्याने मी आजोबांना गाणी आवडल्याचे सांगितलेत्यावर त्यांनी स्मितहास्य देत,ही  सगळी गाणी पंजाबी मुसलमान असलेल्या मोहंमद रफी यांनी गायलेली आणि श्रध्येय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे  भाऊ श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत अशी माहिती पुरवली. त्यांना शिवाजीनगर येथे जायचे असल्याने ते उतरून गेले मात्र  त्यांनी एका नव्या वादळाला जन्म दिला . हे वादळ होते मराठीला किती समृद्ध व...