जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या शहराची सैर घडणारे पुस्तक ' न्यूयॉर्क'
आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीमूळे शहाणपण येते असे संगितले जाते त्यामध्ये पर्यटन , फिरण्याच देखील समावेश होतो. अर्थात प्रयेकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते .तसेच जग एव्हढे मोठे आहे की,पण राहतो तो आंणि त्याला लागून असलेले ४ ते ५ जिल्हे जरी फिरायचे म्हंटले तरी एक ते दोन वर्ष सहज लागू शकतात. (आता अति परिचयात अवज्ञा किंवा आपण लांबचे एरिया आधी बघू . हा भाग काय जवळचा आहे कधीही बघता येईल,असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर भाग वेगळा ) तरी दुसरे देश किमान राज्य बघयाला घेरतले तर सारा आयुष्य देखील पुरणार नाही . मग याला ऊत्तर ते काय ? तर दुसऱ्याच्या अनुभवातून फिरायचे . म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीने लिहलेल्या प्रवास वर्णनातून एखादा प्रदेश समजून घेयचा माझे प्रवासाचे हकीगत' हे आपल्या मराठीतील पहिले प्रवासवर्णन. या पहिल्या प्रवासवर्णनानंतर अनेकांनी आपल्या प्रवास्यांची वर्णन लिहून आपल्या मराठीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात रुजवला आहे. पु. ल देशपांडे, मीना प्रभू या लेखकांनी हा प्रकार मराठी...