महाराष्ट्रातील सांस्कृतिक देवाघेवाण स्पष्ट करणारा दिवाळी अंक 'भवताल'
आपल्या महाराष्ट्राला मोठा समृध्द सांस्कृतिक वारसा मिळाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होणारे आणि बौद्धीक फराळ म्हणून सर्वांना परिचीत असलेले 'दिवाळी अंक' हे या समृध्द सांस्कृतिक परंपरेतील एक महत्तवाचा घटक, ज्याला शतकोत्तर वर्षाची समृध्द परंपरा आहे. आज विविध विषयावर दिवाळी अंक निघत आहेत.कोव्हिड साथरोगामुळे मंदावलेल्या अर्थकारणामुळे ते दोन वर्ष दिवाळी अंकाची परंपरा रोडावली असली तरी ते दोन वर्ष सोडल्यास पुन्हा एकदा ही परंपरा मोठ्या जोमाने पुन्हा एकदा सुरु झाली आहे 2024 या वर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे अनेक विषयावर दिवाळी अंक निघाले आहेत.त्यापैकी एक उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध असलेला 'भवताल' हा दिवाळी अंक मी नुकताच वाचला. नेहमीप्रमाणे भवतालचा हा अंक देखील संग्रही ठेवावा,असाच झाला आहे.प्रत्येकवेळी एक पर्यावरणाशी संबंधीत संकल्पना घेवून, त्यावर आधारीत सुमारे 150 पानाचा अंक काढणारे, लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक अभिजित घोरपडे यांची यावेळची संकल्पना देखील अनोखी आहे. महाराष्ट्रातील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' या पर्यावरणाच्या वि...