पोस्ट्स

फेब्रुवारी १३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिव्यांगांविषयीच्या आपल्या जाणिवा वाढवणारा चित्रपट 'कोशीश

इमेज
चित्रपट हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. हे माध्यम जर खुबीने वापरले तर फार मोठा संदेश सहजतेने देता येतो. इतर ‌वेळी काय कटकट आहे, असे म्हणून संदेश  देणाऱ्याचे नावे बोट मोडण्याची वेळ  येण्याची शक्यता १०० टक्के आहे असे सदेश देखील समाजात मोठ्या प्रमाणात देण्याची ताकद या माध्यमात आहे.ती देखील अरे आपल्याला संदेश देण्यात आला आहे,याची विशेष वेगळी जाणीव न होता. मात्र इतकी प्रभावी ताकद असून देखील या माध्यमाचा सकारात्मकतेने वापर केले गेल्याची उदाहरणे फारच तूरळक आहेत‌. या तूरळक उदाहरणामध्ये नाव घ्यावेच लागेल असा चित्रपट म्हणजे कोशीश. १९७२ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी चित्रपट म्हणून कोशीश ओळखला जातो. त्याचे दिग्दर्शक गुलझार आहेत. या चित्रपटात जया बच्चन आणि संजीवकुमार यांनी साकरलेली  मूक-बधिर दांपत्याची भूमिका आपणास विचार करायला भागच पडते ‘कोशीश’ची कथा हरिचरण आणि आरती या दोघांच्या आयुष्याभोवती फिरते. बोलता व ऐकता न येणाऱ्या दोन व्यक्ती समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी कशी झुंज देतात, याचे हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. संव...