प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक,'सायबर अटॅक'
सध्याचे जग सातत्याने विकसीत होणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे,हे कोणीही नाकारू शकत नाही. कोव्हिड १९ च्या साथरोगानंतर तर आपल्या आयुष्यातील त्याचा वापर अजुनच वाढलेला आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजियन्स क्षेत्रातील प्रगतीमुळे तो अधिकाधीक वाढतच जाणार आहे,हे सुद्धा नाकारता येणे अशक्य.त्यामुळे तंत्रज्ञान स्नेही असणे सध्याचा काळात अत्यंत आवश्यक आहे.जर आपण काळानुरुप बदललो नाही तर कोडॉक, नोकिया या एकेकाळच्या डॉन म्हणता येईल, मात्र आज अस्तिवासाठी लढणाऱ्या कंपन्यासारखे नष्ट होवू तंत्रज्ञानाचाच फायदा घेत त्यात पारंगत होण्याचा विचार केला असता,आपली फसगत होण्याचा धोका देखील मोठा प्रमाणात आहे. ऑफलाईन जगात ज्याप्रमाणे चांगले लोक आहेत वाईट लोक आहेत.तोच प्रकार ऑनलाईन जगात आहे. ऑफलाईन जगात व्यक्ती समोर असल्याने त्याचा देहबोलीतून आपण सदर व्यक्ती चांगली की वाइट हे ओळखु शकतो.मात्र तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारी व्यक्ती समोर नसल्याने, सदर व्यक्ती चांगल्या हेतूने संवाद साधत आहे की, त्याचे हेतू वाइट आहे.हे समजत नाही. सध्या गाजत...