पोस्ट्स

जानेवारी ११, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक 7

इमेज
हा मजकूर वाचताना तूमच्यापैकी अनेकांच्या मनात माझ्यावषयी एकच ओळख ठळकपणे पुढे आली असेल मी प्रामुख्याने एसटी बसच्या माध्यमातून केलेल्या माझ्या सोलो ट्रिप्स. आजपर्यंत पूर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता, जिथे जिथे आपली एसटी पोहोचते, त्या महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक कानाकोपऱ्यात मी अनेकदा भटकंती केली आहे. या प्रवासात नुसती ठिकाणेच नाही, तर माणसे, संस्कृती, अनुभव आणि आठवणी यांचाही साठा जमा झाला. या प्रवासादरम्यान मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. त्यातील काही अनुभव मी यापूर्वी तुमच्याशी शेअर केले आहेतच. मात्र अजूनही काही अनुभव असे आहेत, जे आतापर्यंत सांगायचे राहून गेले होते.तेच न सांगितलेले, वेगळे आणि लक्षात राहिलेले अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचे हे लेखन मी फिरायला जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्यापैकी काही ठिकाणी एसटीची एक पेक्षा जास्त बसस्टँड असतात.त्यामुळे  बसचे व्यवस्थापन करायला एसटी प्रशासन करायला सोपे जाते तसेच  माझ्या सारख्या फिरणाऱ्या व्यक्तीला हे विविध प्रकारचे अनुभव देणारे ठरते. गावात आल्यावर जर पूढे जायचे असल्यास कोणत्...