एसटी महामंडळाची उलट गंगा!
सध्या आपल्या भारतातील सर्वच सार्वजनिक बसवाहतूक महामंडळे प्रवाश्यांना अधिकाधीक उत्तम सेवा कोणत्या प्रकारे देता येईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.राजस्थान, उत्तर प्रदेश सारख्या गरीब राज्यांचे महामंडळ सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीये.मात्र म्हणतात ना, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा या नियमाला एक अपवाद आहे.आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ. आपले महामंडळ घडाळ्याचे काटे मागे फिरवत आपणास 2008 सालची अनुभुती देण्यासाठी पुढे सरसरावले आहे. महामंडळाने 4मार्च रोजी पुर्णत: तयार असलेल्या बसची खरेदीची ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो आपल्या भारतात सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्थेत सर्वप्रथम 2×2 या पद्धतीची आसने बसवून प्रवाश्यांना आरामदायी प्रवाश्याची अनुभुती देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाने पुन्हा एकदा 3×2 बसेस चालवण्याचे ठरवले आहे.4 मार्चच्या काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता हवेच्या दाबाने उघडणारे न्युमटिक दरवाजे ही बसेससाठी सर्वसामान्य बाब झाली असताना, या बसेससाठी पुर्वीप्रमाणे खटकीच...