मानवी भूगोलाच्या दुर्लक्षित उपशाखेला अर्थात वाहतूक भूगोल ला समर्पित दिवाळी अंक 'भवताल'
आपल्याकडे शहाणपण ज्या कारणाने येते, त्यामध्ये केल्याने देशांतरण या घटकाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या मराठीत मीना प्रभू, पु. ल . देशपांडे या सारख्या काही लेखकांनी त्याच्या प्रवासाची वर्णने लिहून त्यांना भेट देताना काय काय अनुभव आले आहेत. हे सांगितले आहेच. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात समावेश होणाऱ्या कल्याण, पनवेल आदी क्षेत्रातून रोज हजारो नागरिक मुख्य मुंबई शहरात येतच असतात, आपल्याकडे धार्मिक हेतू मनात ठेवून ज्या यात्रा आयोजित करण्यात येत असतात . त्यामध्ये आपणास मोठ्या प्रमाणात प्रवास देखील करावा लागतो. असे असून देखील भूगोलाच्या दोन मुख्य शाखांपैकी एक असलेल्या मानवी भूगोलाची एक उपशाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वाहतूक भूगोल या विषयात त्याचा समावेश करून आपण या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ज्याप्रमाणे जेव्हा मोठ्या प्रमाणात अंधार असतो तेव्हा मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड करत असते. त्या प्रमाणे वाहतूक भूगोल या विषयवार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात असताना गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यावरण या...