क्वांटम तंत्रज्ञान : भविष्यातील जगाची किल्ली
सध्याचे जग हे तंत्रज्ञांचे म्हणायला सुरवात होऊन आता सुमारे अडीच पिढ्यांचा काळ उलटून गेला आहे . आताचे जग आहे क्वांटम तंत्रज्ञानाचे . २१ व्या शतकातील विज्ञानतंत्रज्ञान क्षेत्राचे चित्र पूर्णतः बदलवून टाकणारा शोध म्हणजे क्वांटम फिजि नेहमीच्या कम्पुटरच्या मर्यादा ओलांडणारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष प्रयत्न केले या शास्त्रज्ञांमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावेच लागेल ते म्हणजे . जॉन क्लार्क , मिशेल एच . डेवोरेट आणि जॉन एम . मार्टिनिस . यांचे नाव घ्यावेच लागेल किंबहुना या शासत्रज्ञांचे नाव न घेता क्वांटम कम्पुटिंग चा विचार केला तर हाती फक्त आणि फक्त शून्य राहील इतके मोठे योगदान या शास्त्रज्ञाचे आहे . या तीन शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे , आणि याच योगदांबद्दल त्यांना २०२५ चा फिजिक्सचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे . जॉन क्लार्क हे प्रायोगिक...