निखळ आनंद देणारे पुस्तक,' माझा बायकोचा नवरा'
विनोदाचे मानवी जिवनातील स्थान अत्यंत महत्तवाचे आहे. जिवंतपणी जाळते,तीला चिंता म्हणतात. मनुष्याने चिंतेपासून दुर राहण्यासाठी आनंदी राहिले पाहिजे.संकटे येतात आणि जातात.मानवाने आनंदी राहिले तर या संकाटाचा तो सहजतेने तोंड देवू शकतो. या प्रकराची विधाने आपण अनेकदा वाचतो ,ऐकतो. आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय योजता येतात.त्यात अनेक व्यक्तींकडून वापरण्यात आलेला उपाय म्हणजे, विनोदी साहित्य वाचणे.आपल्या मराठीला मोठ्या प्रमाणात विनोदी साहित्याचा वारसा आहे.पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, चि.वि.जोशी अस्या अनेक लेखकांनी विनोदाला एका उत्तम उंचीवर नेवुन ठेवला आहे.याच परंपरेतील एक पुस्तक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ साहित्यीक नरेश महाजन सरांनी लिहलेले आणि शद्बमल्हार प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक माझा बायकोचा नवरा'हे पुस्तक. मी नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय 'सार्वजनिक वाचनालय नाशिक' अर्थात सावानाच्या मदतीने नुकतेच वाचले. 160 पानी या पुस्तकात 13 विनोदी कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.विनोद म्हटला की टिव्हीवरील कार्यक्रमांमुळे सध्याचा काळात आपल्या...