भारत चीन संबंधांचा आत्ताच्या काळापर्यंत सविस्तर आढावा घेणारे पुस्तक 'भिंती आडचा चीन'
आपल्या मराठीत सध्या जागतिक राजकारणाविषयी अनेक नवं नवीन पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. या पुस्तकांमुळे आता आतापर्यंत काहीसा अपरिचित असणारा भारताचे परराष्ट्र धोरण हा विषय मराठी जणांना मोठ्या प्रमाणात परिचित होत आहे. या सकारात्मक बदलातील एक घटक असलेले 'भिंती आडचा चीन',हे श्रीराम कुटे लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक मी नुकतेच सावाना या नाशिकमधील सुप्रसिद्ध सांस्कृतिक संस्थेच्या मदतीने वाचले. भारत चीन संबंधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफशियल इंटेलिजियन्स क्षेत्रात चीन करत असलेली प्रगतीमुळे काय फरक पडू शकतो आणि का फरक पडणार ? याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.तसेच गेल्या दोन वर्षापासुन सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे भारत आणि चीन राजनैतिक संबंधावर देखील हे पुस्तक भाष्य करते.या खेरीज भारताला चीनच्या विचारसरणीचे, आर्थिक लष्करी आणि राजकीय आव्हान भविष्यात कसे असेल या मुद्द्यांवर देखील या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे ...