प्रसिद्ध पुस्तकांचे वाचन आणि मी (माझे वाचन भाग क्रमांक ६)
मी मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचतो, हे समजल्यावर सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीशी माझी जूजबी ओळख असते,अश्या व्यक्ती मला तुम्ही राधेय वाचले असेल. ययाती वाचले असेल. पानिपत वाचले असेल, असे प्रश्न विचारतात. माझे सर्वसाधारण असे निरीक्षण आहे की या व्यक्ती ज्या पुस्तकांची नावे घेतात ती नावे सुप्रसिद्ध पुस्तके या वर्गवारी मोडणारीच असतात. तसेच या पुस्तकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणता येऊ शकते ते म्हणजे ही सर्व पुस्तके काही मोजके अपवाद वगळता कादंबरी या प्रकारातील असतात. कादंबरी खेरीज अन्य साहित्यप्रकार जसे नाटक, काव्यसंग्रह, प्रवासवर्णने, चरित्र, कथासंग्रह, किंवा ना. सि.फडके यांनी जो साहित्यप्रकार मराठीत मोठ्या प्रमाणात रूजवला तो साहित्यप्रकार अर्थात ललित निबंध लेखन या प्रकारातील पुस्तके नसतात. नाही म्हणायला काही चरित्र आत्मचरित्र असतात. मात्र त्यांची संख्या फारच नगण्य असते. मुख्य भर हा कादंबरीवरच असतो. या व्यक्तींशी थोडा जास्त संवाद साधला की या व्यक्तींचे वाचन काहीसे कमी असल्याचे माझे निरीक्षण असते. माझ्या अनुभव हा त्रिकाल बाधित सत्य आहे असे मुळीच म्हणता येणार नाही याची मला पूर्ण जाणीव आह...