माझे आवडते लेखक (माझे वाचन भाग4)
मला अनेकजण अजिंक्य तूझा आवडता लेखक कोण ? असा प्रश्न सातत्याने विचारतात, त्या व्यक्तींना सविस्तर उत्तर देण्यासाठी आजचे लेखन . तर माझे आवडते लेखक आहेत. ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आणि मराठी ज्ञान भाषा व्हावी यासाठी झटणारे आणि मराठीत विविध विषयांवर माहितीपुर्ण असी 55पुस्तके लिहणारे अच्युत गोडबोले. हो मला गिरीश कुबेर आवडतात. आपल्या मराठी संत वाड़मयातील सुप्रसिद्ध वचन 'उत्तमाची ते घ्यावे, मिळमिळत ते टाकून द्यावे,' हे वचन मी अंगीकारत गिरीश कुबेर यांची देशांतर्गत मते बाजूला सारत त्यांच्यातील अर्थशास्त्रज्ञ आणि पश्चिमी आशियाविषयीचा अभ्यास यामुळे मला गिरीश कुबेर आवडतात.अच्युत गोडबोले यांच्याविषयी एका वाक्यात बोलायचे झाल्यास, मला ज्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात.त्याच प्रकारची पुस्तके अच्युत गोडबोले लिहीत असल्याने ते माझ्या आवडत्या दोन लेखकांपैकी एक झाले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाला विविध कांगोरे असतात. व्यक्तीचा एखादा पैलू आपल्याला आवडत नसला, तरी त्यावरुन व्यक्तीला न्यायालयातील पिंजऱ्यात उभे करणे सर्वथा अयोग्यच.हे आपण गिरीश ...