गणिताची रंजक सफर घडवणारे पुस्तक नंबर्स
गणित ! अनेकांचा नावडता विषय.नको ते आकडे, नको ती समिकरणे.असाच आपल्यापैकी काहीचा आग्रह असण्याची शक्यता अधिक आहे.दहावीच्या शालांत परिक्षेत देखील ज्या विषयात मुल मुली सर्वात जास्त नापास होतात असा इंग्रजीनंतरचा विषय म्हणजे गणित होय. तर असा गणित विषय सुद्वा रंजक आहे. गणितात मनुष्याला खिळवून ठेवण्याची ताकद आहे असे सांगितले अनेकांना ते खोटे वाटण्याची शक्यता अधिक.गणित सोपे प्रत्येक पायरी सविस्तर सांगून समजवता येईल,मात्र गणित रंजक करता येणार नाही असेच अनेकाचे म्हणणे असेल.मात्र गणित रंजक ,खिळवून ठेवण्याची किमया केली आहे.अच्युत गोडबोल आणि डॉ.विद्यागौरी प्रयाग यांनी लिहलेल्या नंबर्स या या पुस्तकाने. मधूश्री प्रकाशनाच्या सव्वा तीनशे पानाच्या पुस्तकात १२प्रकरणाद्वारे आपणास गणितातील रंजकता समजते.नाशिकमधील महत्तवाचे वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक याच्या पुस्तक संग्राहलयातून हे पुस्तक मी नुकतेच वाचले. या पुस्तकाच्या १२प्रकरणापैकी पहिल्या प्रकरणात आपणास संख्या कस्या निर्माण झाल्या?याविषयी २८पानामधून माहिती मिळते तर २८पानाच्या दुसऱ्या प्रकरणातून...