पोस्ट्स

डिसेंबर १५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नटसम्राट..‌.आयुष्याची दाहकता थेटपणे उलगडवून दाखवणारे नाटक

इमेज
                                     आपल्या मराठीला अनेक अजरामर साहित्याची परंपरा लाभलेली आहे.जी जिवनाच्या प्रत्येक अंकाला आपले मराठी साहित्य स्पर्श करते.साहित्याचा सर्वच प्रांतात जसे कथासंग्रह, कांदबरी,‌निबंधवजा लेखन,काव्यसंग्रह अगदी नाटकांमध्ये सुद्धा आपल्याला हा ठसा उमटलेला दिसतो.आपल्या मराठीत अनेक धीरगंभीर विषय देखील नाटकांनी यशस्वीरीत्या समाजापुढे आणले आहेत. याच मालिकेत समाविष्ट होवू शकणारे अजरामर नाटक म्हणजे 'नटसम्राट'.माझ्याकडे हे पुस्तक २००४ पासून आहे‌.मी हे पुस्तक अनेकदा वाचलयं. १५ डिसेंबर रोजी घर आवरताना मला हे पुस्तक दिसले,असो .               तरुणपणी अत्यंत यशस्वी असलेल्या मात्र म्हातरपणात सर्वकाही मुलांकडे सोपवल्याने कफल्लक झालेल्या एका नटाची कथा या नाटकात सांगण्यात आल्याचे आपणास माहिती असेलच. माझ्यामते या नाटकाचे थोडक्यात वर्णन करायचे असल्यास गुरुदत्त या दिग्दर्शित केलेल्या प्यासा या चित्रपटातील 'जाने वो कैसै लोग थे,जिनको प्यार को प्यार मिला, जब ...

पाकिस्तानमधील राजकीय.सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा मागोवा घेणारे पुस्तक, 'कुंपणापलीकडला देश पाकिस्तान'

इमेज
                                 आपल्याकडे पाकिस्तानचे नाव निघाल्याबरोबर सर्वसाधारतः वैरभावना जागृत होते आता काश्मीरमध्ये दहशदवादी कारवाया होत नसल्या तरी, या आधी काश्मीर मुद्यावरून झालेली तीन युद्धे बघता, ती बरोबरच म्हणता येईल . मात्र ही  युद्धे तेथील राजकारणी आणि लष्करशाहीने भारतावर लादलेली होती तेथील जनसामान्यांनी भारताबरोबर केलेली युद्धे नव्हती ती. राजशात्राचा विचार करता, सर्वसामान्य जनता आणि शासनकर्ते या दोन्ही एकमेकांना पूरक मात्र एकमेकांपासून पूर्णतः  वेगवेगळ्या  बाबी आहेत.  त्यामुळे त्यांची सरमिसळ करत शासनकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची मते एकच आहेत असे समजणे चुकीचे आहे,  एकेकाळी एकाच देशाचा भाग असलेल्या आणि आपल्या भारतात काही वर्षापर्यत दहशतवादी कारवाया करणाऱ्या आपल्या शेजारी  देशाची मोठ्या प्रमाणात माहिती असणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते आपणस  माध्यमात येणाऱ्या बातम्यांद्वारे तेथील शासनकर्त्यांची मते समजतात मात्र सर्वसामान्य जनतेची मते समजत नाहीत त्याम...