पोस्ट्स

व्यक्तींवर आधारित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

होय महात्मा गांधींमुळेच !

इमेज
नेत्रदानाचा एका सुप्रसिद्ध जाहिरातीत अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे, कुछ लोंगो केलीय मेरी आवाज ही मेरी पहचान है! आपल्या भारताच्या संदर्भात हे वाक्य म्हणायचे झाल्यास महात्मा गांधी हीच काही लोकांसाठी भारताची ओळख आहे.अमेरीकेत कृष्णवर्णीयांचा हक्कांसाठी लढा उभारणारे मार्टिन ल्युथर किंग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन म़डेला ही त्यापैकी काही प्रमुख नावे .मात्र दुर्देवाने आपल्या भारतात काही उजव्या लोकांकडून त्यांची खिल्ली उडवली जाते‌.पाकिस्तानचा निर्मितीचे पाप त्यांच्या गळ्यात मारले जाते. जनभावना सरदार पटेल यांनी भारताचे पहिले पंतप्रधान व्हावे, ही  असताना, पंडीत नेहरु यांना स्वत:ची इच्छा म्हणून पंतप्रधान केले असा आरोप करतात.मात्र  हे लोक विसरतात की, महात्मा गांधी आहे, म्हणून आपला भारत देश आज टिकून आहे.जगातील चौथी मोठी आर्थिक ताकद आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान मान्य करावेच लागेल.त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला जनसामान्यापर्यत पोहचवले.क्रांतीकारकांच्या मार्गाचा अवलंब प्रत्येक सर्वसामान्य नागरिक  करू शके...