बदलत्या तंत्रज्ञानाची सखोल सविस्तर माहिती देणारे पुस्तक 'इंडस्टी 4.0
सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे. आता जगात तूमच्या शारिरीक शक्तीपेक्षा अधिक महत्व तंत्रज्ञानाचे आहे हे आपण रोजच्या जगण्यात पदोपदी अनुभवतोच, या सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण मागे पडू नये यासाठी आपण सर्वच जण आपल्यापरीने प्रयत्नशील देखील असतो .मी देखील या प्रयत्नात असताना मला एक खजिना गवसला तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या आय.बी एम.सारख्या प्रख्यात कंपनीत काही काळ कार्यरत असणारे डॉ .भुषण केळकर सरांनी लिहलेले इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक. केळकर सरांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने पुस्तकाला परीपुर्ण केले आहेच हे सांगायला नकोच. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.केल्यामुळे डॉ.भूषण केळकर सरांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रेष्ठत्व वेगळे सांगायलाच नको. डॉ.भूषण केळकर सरांनी लोकमतच्या ऑक्सिजन या तरुणाईसाठीच्या पुरवण्यांसाठी लिहलेल्या लेखांचे पुस्तकस्वरुपात पुनर्प्रकाशन म्हणजे हे पुस्तक .डॉ.भुषण केळकर सरांच्या त्या लेखमालिकेला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील लेख...