पोस्ट्स

फेब्रुवारी २२, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी

इमेज
शीर्षक वाचून गोंधळलात का? हा कोणत्या घटकाविषयी बोलणार आहे,असा प्रश्न तूम्हाला पडलेला असेल तर पहिलेच सांगतो मी बोलणार आहे, विविध वर्तमानपत्रात येणाऱ्या 'नव्या पुस्तकाची ओळख' आणि 'मी वाचलेले पुस्तक' या सारख्या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणाऱ्या लेखाविषयी तसेच पुस्तकाविषयी सांगणाऱ्या  टीव्हीवरील वेगवेगळ्या  चॅनेलवरील कार्यक्रम अणि युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओविषयी‌.सर्वसाधरणपणे पुस्तक म्हटले की प्रकाशक, वाचक याविषयी बोलले जाते, असा माझा अनुभव आहे.म्हणून म्हटले पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी तर वाचक मित्रांनो, टिव्हीवर पुस्तकावरील कार्यक्रमाचा विचार करता समोर येणारे चित्र काहीसे निराशाजनक आहे.डी.डी. सह्याद्री आणि डि.डी.इंडीया या सारख्या सरकारी चॅनलचा अपवाद वगळता इतर ठिकाणी पुस्तकाविषयी फारसे कार्यक्रम मला तरी आढळत नाही.नाही म्हणायला न्युज 18 मराठी जेव्हा आय.बी.एम लोकमत होते, त्यावेळी त्यावेळी ' वाचाल तर वाचाल' हा साप्ताहिक कार्यक्रम होत असे.केतकी जोशी या वृत्तनिवेदिका तो सादर करत असे. त्याचा अपवाद वगळता इतर खासगी वाहिनीवरील पुस्तक...