होय महात्मा गांधींमुळेच !
नेत्रदानाचा एका सुप्रसिद्ध जाहिरातीत अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे, कुछ लोंगो केलीय मेरी आवाज ही मेरी पहचान है! आपल्या भारताच्या संदर्भात हे वाक्य म्हणायचे झाल्यास महात्मा गांधी हीच काही लोकांसाठी भारताची ओळख आहे.अमेरीकेत कृष्णवर्णीयांचा हक्कांसाठी लढा उभारणारे मार्टिन ल्युथर किंग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन म़डेला ही त्यापैकी काही प्रमुख नावे .मात्र दुर्देवाने आपल्या भारतात काही उजव्या लोकांकडून त्यांची खिल्ली उडवली जाते.पाकिस्तानचा निर्मितीचे पाप त्यांच्या गळ्यात मारले जाते. जनभावना सरदार पटेल यांनी भारताचे पहिले पंतप्रधान व्हावे, ही असताना, पंडीत नेहरु यांना स्वत:ची इच्छा म्हणून पंतप्रधान केले असा आरोप करतात.मात्र हे लोक विसरतात की, महात्मा गांधी आहे, म्हणून आपला भारत देश आज टिकून आहे.जगातील चौथी मोठी आर्थिक ताकद आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान मान्य करावेच लागेल.त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला जनसामान्यापर्यत पोहचवले.क्रांतीकारकांच्या मार्गाचा अवलंब प्रत्येक सर्वसामान्य नागरिक करू शकेलच असे नाही.पण त्यांनी दाखवलेल्या सत्याग्रहाचा मार्गाचा सहजतेने अवलंब करता येण्यासारखा होता .भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीकारकारकांचा सशस्र मार्ग आणि महात्मा गांधी यांचा अहिंसक मार्ग दोघांचे सारखेच योगदान आहे.फक्त एकाच मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळाले असे समजणे पुर्णत: चूकीचे आहे.क्रांतीकारकांनी सशस्त्र लढा उभारला मात्र त्यास जनतेकडून पाठबळ नसते तर भारताचे स्वातंत्र्याचे चित्र आजच्यापेक्षा खुप वेगळे असते. आफ्रिका खंडातील अनेक देशात क्रांतीकारी मार्गानेच स्वातंत्र्य मिळाले.मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गटांमध्ये मतैक्य न झाल्याने प्रगती सोडून द्या आज ते देश फुटीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. मला असे बिलकुल म्हणायचे नाही, की फक्त महात्मा गांधीमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले क्रांतीकारकांचे योगदान देखील महत्त्वाचे आहे.पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताची प्रगती होण्याचा सामाजिक पाया हा महात्मा गांधीनी घातला. या पायामुळेच आफ्रिकेतील इतर देशांचे जसे शोषण झाले तसेच भारताचे शोषण होऊन सुद्धा आज त्यानंतर 78 वर्षांनी भारत महासत्ता होण्याचा दृष्टीने वाटचाल करतोय.तर आफ्रिकेतील देश अजूनही चाचपडताय. भारताच्या स्वातंत्र्यावेळचे ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल यांनी भारताच्या विविधतेमुळे पुढील १०, ते १५ वर्षात वेगवेगळे देश निर्माण होतील,असे विधान केले होते.ते खोटे ठरले ते महात्मा गांधीच्या शांततेच्या मार्गाने प्रश्नांची हाताळणी केल्यामुळेच हे नाकरता येणे निव्वळ अशक्यच. महात्मा गांधी यांची सर्वच मते योग्य होती.असे नाही. मात्र आज जे चित्र उभे केले जाते, आणि त्यांनी देशाचे वाटोळेच केले असे ठासून सांगण्यात येते ते पुर्णत: चूकीचेच आहे, हे मात्र ठामपणे म्हणता येते.प्रत्येक व्यक्तीत काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतात. आता वाईट गोष्टीला अधिक महत्त्व देत,चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे सुद्वा चूकीचेच ना? माझ्यामते. आपल्याकडून महात्मा गांधींना हा न्याय लावला जातोय. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी त्यावेळचा नेहरु सरकारने आणि पुढील सरकारने नाकारल्या हे देखील आपण बघितले पाहीजे.
महात्मा गांधी यांच्यावर एक आरोप नेहमी केला जातो.पाकिस्तानला ५५ कोटी रूपये देण्याचा.मात्र हा आरोप करणारे एक गोषृट विसरतात की १मे १९६० साली त्यावेळच्या मुंबई राज्यातून महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये निर्माण करताना महाराष्ट्राने गुजरातला ६५ कोटी रुपये दिले आहेत.मोरारजी देसाई या गुजराती भाषिक मुख्यमंत्र्याने मुंबईतील मराठी भाषिकांवर अत्याचार केला असताना देखील.कोणत्याही नव्या प्रशासनिक विभागाची निर्मिती होत असताना असे पैश्याचे आदानप्रदान होतच असते.आपल्या भारतात आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बिहारमधून झारखंड आदी राज्ये निर्माण होताना देखील असे आदानप्रदान होतच असते.किंबहूना ३जून १९४७ साली ब्रिटीश संसदेत पारीत करण्यात आलेल्या भारताच्या स्वातत्र्याचा कायद्यातच तरतूद आहे की, त्यावेळच्या सरकारी संपत्तीचै योग्य पद्धतीने वाटप करण्यात यावे.त्यानुसार ते होत होते.लेखाचा विषय महात्मा गांधी असल्याने इतरांची मते मला विचारात घेण्याची आवश्यकता वाटत नाही.असो.
महात्मा गांधी या व्यक्तीमत्वाला अनेक पैलू आहेत. ते सर्व एकाच लेखात समाविष्ट करणे अशक्यच .त्या प्रत्येक पैलूवर एक स्वतंत्र्य लेख होऊ शकतो.मात्र ते मला शक्य नाही तरी आजच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांचा स्मृतीस वंदन करुन इथेच थांबतो.जय हिंद
टिप्पण्या