सिंगापूर चिनी भाई भाई



सध्या समस्त भारतात बिहार विषयी चर्चाचवण करत असताना आपल्या भारताच्या प्रगतीला अडथळा ठरू शकणारा रिपब्लिक आँफ चायना अर्थात 1962ला आपल्यावर आक्रमण करणारा तसेच मुलत: भारताचा असणारा भाग पाकिस्तान कडून घेणार्या चिनचे राष्ट्रपती सिंगापूर च्या दोन दिवसीय भेटीवर आहेत . तिथे त्यांनी अनेक आर्थिक करार केल्याचे चँनेल न्यूज एशिया च्या सिंगापूर टू नाईट या विशेष बातमीपञात सांगितले गेले आहे . मागील दिड महिन्यापुर्वीच सिंगापुर मध्ये नविन सरकारची स्थापना करण्यात आली आहे . चिनच्या पश्चिम भागात सिंगापूर काही प्रकल्प उभारणार आहे , असे या बातमीत म्हटले आहे .भारताला लागूनच चिनचा काही पश्चिम भाग येतो . सांगायचा मुद्दा अशा की फक्त आपले नरेंद्र मोदीच जगात फिरत नाहीये ईतर राष्ट्रप्रमुख सुध्दा फिरत आहेत . चिनच्या रिझर्व बँक ने सिंगापूर च्या आर्थिक क्षेञात काही गुंतवणूक सुध्दा केलीये . स्वामी विवेकानंद शिकागो (मराठीत चिकागो )च्या धर्मपरीषदेसाठी यूनाटेड स्टेट आँफ अमेरिका मध्ये श्रीलंका आग्येय आशिया चिन जपान मार्गे गेले होते त्या प्रसंगी त्यानी चिन्यांचे वर्णन झोपलेला ड्रॉगन असे केले होते . ते असेही म्हटले होते की हा ड्रॉगन जागा झाल्यास जगाला संपवेल . स्वामी विवेकानंदांनी यु एस ए मध्ये असताना भारतातील लोकांना काही पञे लिहली आहेत. (नागपुरच्या रामक्रुष्ण मठातर्फे त्याचे मराठी भाषांतर उपलब्ध आहे ) त्यात 1892 साली युरोपात मोठे यूध्द होउ शकते असे सांगितले आहेत .
जे पुढे झालेच .स्वामी विवेकानंदाबाबत पुर्णत: आदर व्यक्त करत मला त्यांचे चिन बाबतचे भविष्य खोटे ठरावे असे वाटत आहे . एकिकडे हे बदल होत असताना आपण अजून मंडल कि कमंडल च्याच वादात अडकल्याचे मला तरी वाटतंय . चिनने 1978 साली राजकिय व्यवस्था न बदलता खाउजा धोरण स्किकारले .जे आपण 1991 स्किकारले तेही नाइलाजानेच . 1978 साली आपण मोरारजी देसाई या क्रॉग्रेस मधील अत्रुप्त आत्माच्या नेत्रूवाखाली जनता पार्टी या कॉग्रेस विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये तूमचे सदस्यत्व नक्की कोणते ? यावरून भांडत होतो . तसे यावर अजून बरेच बोलता येइल पण तूर्तास आपली रजा घेतो
जाता जाता : सध्या कँनडा देशात नुकतेच तयार झालेल्या केंद्रीय मंञीमंडळात अनेक शिख व्यक्ती आहेत
क्रिकेटमध्ये सध्या पाकिस्तान इंग्लड तसेच आँस्टेलिया न्युझिलंड याच्यांत टेस्ट मँचेस सूरू आहेत .
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?