उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे बीज असलेली कादंबरी, 'फकिरा'
आपल्या मराठीचे साहित्यविश्व अत्यंत समृद्ध आहे. उकृष्ट चित्रपट निर्मिती होऊ शकते अश्या कादंबरीची मराठीत अक्षरशः खाण आहे. गो नि दांडेकर यांची शितू असो किंवा डॉ सुमती देशपांडे यांनी लिहलेली सुप्रसिद्ध अशी महाश्वेता ही त्यांची प्रमुख उदाहरणे त्यापैकी महाश्वेता या कादंबरीवर आधारित मालिका खूपच गाजली होती. याच मालिकेत समाविष्ट होऊ शकेल मात्र तिच्यावर चित्रपट किंवा मालिका निघालेली नाही अशी कादंबरी म्हणजे अण्णा भाऊ साठे लिखित फकिरा. लौकिक अर्थाने फारसे शिक्षण नसले तरी अंगभूत प्रतिभा, जगताना आलेले अनुभव यातून किती उत्कृष्ट कलाकृती जन्माला येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'फकिरा ही कादंबरी जी मी नुकतीच वाचली जी वाचताना आपल्याला एका योध्याची संघर्षाची कथा वाचत आहोत हे पदोपदी जाणवते फकिरा ही मराठी साहित्यातील अत्यंत गाजलेली आणि सामाजिक आशयाने समृद्ध अशी कादंबरी आहे आजपासून ६५ वर्षांपूर्वी १९५९ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालाय. या कादंबरीची कथा ब्रिटिशकालीन ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर घडते. जी प्राम...