शोध एक प्रगल्भ आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाचा 'प्यासा'
काही व्यक्तिमत्त्वे मोठी विलक्षण असतात. त्यांच्या विषयी कितीतरी वेळा, कितीतरी वेळ बोलत राहिलो. लिहीत राहिलो तरी दरवेळी त्यांच्याविषयी काय लिहायचे ,काय बोलायचे याचा विचार केला तर दरवेळी कोणतातरी वेगळा मुद्दा , व्यक्तिमत्त्वातील आतापर्यंत फारशा चर्चित ना गेलेला पैलू आपणस गवसतो . आणि आपल्याला या व्यक्तिमत्त्वाची पूर्ण माहिती झाली आहे.असे वाटत असताना आपणाला या व्यक्तीची पुरेशी माहिती नाही याची जाणीव होते. आज ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा मजकूर लिहीत असताताना ज्यांचे निधन होऊनच ६० वर्ष झाली आहेत, तरी ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय बॉलिवूवंडचा इतिहासच लिहिता येणार नाही. किंबहुना त्यांना वगळून इतर सर्व व्यक्तींची माहिती लिहिली तरी त्या इतिहासाची किंमत सकाळी शौचास बसण्यासाठीचा कागद अशीच करावी लागेल असे बॉलिवूवडमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, सिने निर्माते, सिने अभिनेते, सिने दिग्दर्शक असा सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांचा समावेश अश्याच काही विलक्षण व्यक्तिमत्वांमध्ये करावा लागेल.
३०८ पानाच्या या पुस्तकातून २५ प्रकरणातून लेखकाने गुरुदत्त यांचे विवाहपूर्व कौटुंबिक जीवन विवाहापश्चात त्यात झालेले विनाशकारी बदल सुरवातीची आर्थिक स्थिती , त्यांचे नृत्य विषयक शिक्षण त्यांच्या चित्रपट श्रुष्टीतील प्रवेश ,चित्रपट श्रुष्टीत होणारे बदल त्यांनी कोणत्या प्रकारे बघितले ? इतरांना कोणत्या प्रकारे बघायला लावले ? पहिल्यांदा भागीदारीत आणि नंतर स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था कोणत्या प्रकारे काढली ? चित्रपट निर्मितीसाठी ते कोणत्या प्रकारे अभ्यास करत ? सहकलांकारांविषयी त्यांची मते,भूमिका काय होती ? त्यांची चित्रपट निर्मिती कोणत्या प्रकारे घेत ? गीता दत्त यांच्याशी त्याचे संबंध का दुरावले ? संबंध दुरावू नयेत यासाठी गुरुदत्त यांनी काय प्रयत्न केले ? गीता दत्त यांच्याशी संबंध दुरवण्यामागे गुरुदत्त यांनी त्यांना गाण्यास केलेला विरोध, गीता दत्त यांच्या मनात वहिदा रेहमान यांच्याविषयी असलेली अधी गुरुदत्त त्यांणी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात झोकून दिल्यामुळे त्यांचे संसाराकडे झालेले दुर्लक्ष आणि सरतेशेवटी दक्षिण मुंबई उच्चभू परिसरातील पेडर रोडमधील घरात झालेला मृत्यू याविषयी सांगते. पुस्तकाच्या अखेरच्या २५ व्या प्रकरणाच्या शेवटच्या काही पानांत लेखकाने गुरुदत्त यांचे अचानक झालेले निधन ही आत्महत्या नव्हती तर तो हार्ट अटॅकच होता हे गुरुदत्त यांचे फॅमिली डॉक्टर रिबिनो यांचा हवाला सांगितले आहे .
गुरुदत्त यांच्या विषयीची दोन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत गुरुदत्त यांच्या चित्रपट निर्मितीविषयी सांगणारे ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि अरुण खोपकर लिखित 'गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका' हे पहिले पुस्तक आणि सत्या सरन यांनी लिहलेले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारे 'त्या १० वर्षातील गुरुदत्त' .हि पुस्तके त्यांत माहितीपूर्ण असली तरी गुरुदत्त यांच्या एकाच पैलूवर प्रकाश टाकतात . मात्र रोहन प्रकर्षानतर्फ़े प्रकशित या पुस्तकात आपणास वंसतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांच्या वैयक्तिक आणि चित्रपट निरिटी अश्या दोन्ही पैलूंची ओळख होते. त्यामुळे हे पुस्तक या दोन्ही प्रसिद्ध पुस्तकांपेक्षा काहीसे वेगळे ठरते मग वाचणार ना हे पुस्तक !गुरुदत्त तीन अंकी शोकांतिका' या पुस्तकाविषयी मी लिहलेले वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/10/3-450-3-2016.html
त्या १० वर्षातील गुरुदत्त' .' या पुस्तकाविषयी मी लिहलेले वाचण्यसासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2018/11/blog-post.html
अजिंक्य तरटे
९५५२५९९४९५
९४२३५१५४००



टिप्पण्या