जपानच्या कार्यसंस्कृतीतून देशाची ओळख करून देणारे पुस्तक 'जपान'
जेव्हा आपण कोणतेही कारण असो आपला प्रदेश सोडुन दुसऱ्या देशात जातो,तेव्हा नवीन प्रदेश आपल्याशी विविध प्रकारे संवाद साधत असतो.तेथील पर्यटनस्थळे आपण ज्या प्रदेशात आलोय,त्या प्रदेशाचा ऐतिहासिक वारसा तसेच त्या प्रदेशावर निसर्गाने केलेली उधळण सांगत असतात, तर आपल्या वास्तवात आपल्या ज्या लोकांशी संपर्क येतो ते लोक त्या लोकांची परदेशी लोकांविषयीची भावना, तेथील कार्यसंस्कृती, तेथील समाजजीवनातील व्यक्तींचे स्थान, त्यांची स्वत:च्या प्रदेशाविषयीची भावना तसेच दुसऱ्या ज्या प्रदेशातून आपण आलेलो असतो,त्या प्रदेशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता याविषयी माहिती देत असतात.या संवादातून आपणास त्या प्रदेशाची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते.या माहितीमुळे आपले त्या प्रदेशाशी आपली नाळ देखील जोडली जावू शकते असी नाळ जोडली गेल्यास आपण सातत्याने त्या प्रदेशात जावू इच्छितो,तेथील लोकांशी आपली मैत्री देखील होते. आपण दुसऱ्या प्रदेशात गेल्यावर आपणास आलेले अनुभव जर लिहुन प्रसिद्ध केले तर आपले अनुभव वाचून इतर लोकसुद्धा त्या प्रदेशाविषयी माहिती करुन घेवू शकतात.त्यामुळे प्रवासवर्णने अत्यंत महत्ताची ठरतात.आपल्या मराठीत पु.ल.देशपांडे यांची प्रवासवर्णने अत्यंत प्रसिद्ध आहेत.सध्याचा काळात मीनाप्रभू यांनी लिहलेली प्रवासवर्णने विशेष प्रसिद्ध आहेत.याच प्रवासमालिकेत समाविष्ट होवू शकेल असे प्रवासवर्णन मी नुकतेच सार्वजनिक वाचानावल नाशिक या नाशिकमधील सर्वात जून्या सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित संस्थेच्या सहकार्याने वाचले.
अविनाश भिडे यांनी
त्यांच्या सुमारे पाच ते
सहा महिन्याचा जपानच्या
वास्तव्यात जपानची
जी कार्यसंस्कृती अनुभवली
त्याचे शब्दरूप म्हणजे मी
वाचलेले हे पुस्तक
होय. व्यवसायाने इंजिनियर
आणि एका मेकॅनिकल कंपनीत उच्चपदस्थ
असलेले, अविनाश भिडे हे
भारतात कार्यरत असणाऱ्या, आपल्या
कंपनीत बसवण्यात येणाऱ्या, एका
यंत्राचे तांत्रीक प्रशिक्षण घेण्यासाठी,
क्योटो मशिन कंपनीत
गेले होते.त्यावेळी
त्यांनी जपानची कार्यसंस्कृती जवळून
अनुभवली. आपण अनुभवलेली
जपानची संस्कृती त्यांना इतरांनी
देखील अनुभवावी,असे
वाटले.त्यामुळे त्यांनी
आपले अनुभव पुस्तकरुपाने
प्रसिद्ध केले.तेच
हे सुमारे २००पानांचे
पुस्तक. या पुस्तकाचे
प्रकाशन सुकृत प्रकाशन करण्यात
आलेले आहे.
जपानची कार्यसंस्कृतीविषयी बोलताना लेखकाने त्यांची झिरो डिफेटेव्ह
पद्धत,त्यांचे वेळेचे
नियोजन, कायझेन पद्धत, टिम
स्पिरीट,कोणत्याही गोष्टीचे सुक्ष्म
नियोजन,इतरांचा साहनभुतीपुर्वक विचार
करण्याची वृत्ती, क्वालिटी सर्कल
ही संकल्पना वाडवडीलांच्या
कर्तुत्वावर टिमकी वाजवण्यापेक्षा स्वकर्तृत्वाला जपानला देण्यात आलेले
महत्व आपणास सांगितले
आहे. जपानी लोकांच्या
सामाजिक आणि सांस्कृतिक
जीवनाविषयी बघायचे झाल्यास पुस्तकाचे
वाचन केल्याने आपणास
जपानची खाद्यसंस्कृती, तेथील लोकांची परिसर
स्वच्छतेबाबतची खोलवर रुजलेली जाणिव,
आपल्या वारकरीसारखी तेथील दिंडीची
परंपरा, तेथील पोलीसी व्यवस्था,लोकांंची दुसऱ्यास मदत
करण्याबाबतचा सहजभाव, वाहतूकीचे नियम
पाळण्याचा त्यांची सहजवृत्ती,आदिंविषयी
माहिती मिळते.तर त्यांचा
बुलेट ट्रेन,डायव्हरविरहीत
ट्रेन ,टोकियो टॉवर
यांच्यविषयी वाचल्याने आपणास जपानचे
तंत्रज्ञानातील हुकूमत समजून येते.
तर लेखकाने आपल्या
कामाच्या ठिकाणी, राहण्याचा ठिकाणी बरोबर
असलेल्या लोकांबरोबर केलेल्या चर्चेतून
आपणास जपानी लोकांचा
भारताविषयीचा स्नेह,तसेच जपानी
लोकांचा देशाभिमान, याविषयी माहिती
मिळते..
आपण स्वत: जपानला गेले
असल्यास आपले अनुभव
ताडून बघण्यासाठी आणि
न गेल्यास भारतात
राहुन देखील जपान
अनुभवण्यासाठी हे पुस्तक
वाचायलाच हवे..



टिप्पण्या