जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 1)

शीर्षक वाचून गोंधळलात का? हा कोणत्या घटकाविषयी बोलणार आहे,असा प्रश्न तूम्हाला पडलेला असेल तर पहिलेच सांगतो मी बोलणार आहे, विविध वर्तमानपत्रात येणाऱ्या 'नव्या पुस्तकाची ओळख' आणि 'मी वाचलेले पुस्तक' या सारख्या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणाऱ्या लेखाविषयी तसेच पुस्तकाविषयी सांगणाऱ्या  टीव्हीवरील वेगवेगळ्या
 चॅनेलवरील कार्यक्रम अणि युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओविषयी‌.सर्वसाधरणपणे पुस्तक म्हटले की प्रकाशक, वाचक याविषयी बोलले जाते, असा माझा अनुभव आहे.म्हणून म्हटले पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी
तर वाचक मित्रांनो, टिव्हीवर पुस्तकावरील कार्यक्रमाचा विचार करता समोर येणारे चित्र काहीसे निराशाजनक आहे.डी.डी. सह्याद्री आणि डि.डी.इंडीया या सारख्या सरकारी चॅनलचा अपवाद वगळता इतर ठिकाणी
पुस्तकाविषयी फारसे कार्यक्रम मला तरी आढळत नाही.नाही म्हणायला न्युज 18 मराठी जेव्हा आय.बी.एम लोकमत होते, त्यावेळी त्यावेळी ' वाचाल तर वाचाल' हा साप्ताहिक कार्यक्रम होत असे.केतकी जोशी या वृत्तनिवेदिका तो सादर करत असे. त्याचा अपवाद वगळता इतर खासगी वाहिनीवरील पुस्तकाविषयीचे मराठी भाषेतील कार्यक्रम मला आढळलेले नाहीत. इंग्रजी भाषेत डीस्कव्हरी सारख्या चॅनेलवर होत असतील तर त्याचा विचार मला करायचा नाही .माझा रोख मराठी भाषेतील कार्यक्रमाविषयीच आहे.
मात्र युट्युबचॅनेलवर मात्र या विषयी खूप रेलचेल आहे.पुणे येथे झालेल्या पुस्तक महोत्सवानंतर तर त्यात भरच पडलेली दिसतेय.बोलभिडू सारख्या काही मुख्य धारेतील काही युट्यूब चॅनेलने  बुक कट्टा सारखी प्ले लिस्ट सुद्वा सुरु केली आहे.अर्थात हे उदाहरण मी प्रातनिधीक स्वरूपात घेतले आहे विषय समजावा म्हणून या सारखी अनेक युट्युब चॅनेल आहेत.हे आधीच लक्षात घ्या.
शेवटी वृत्तपत्राच्या बाबत बोलायचे झाल्यास ,आजकाल प्रिंटेड  पुस्तके वाचली जात नाहीत असे सहजतेने बोलले जात असले तरी पुस्तके मात्र पूर्वीपेक्षा जास्त प्रसिद्ध होत आहेत.असे सहजतेने म्हणता येऊ शकते.आत्ता मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमाच्या आणि आर्थिक गणिताचा विचार करता अजून देखील प्रिंटेडपुस्तकाला मोठी मागणी असल्याचे म्हणता येउ शकते.तोच न्याय मी वाचलेले पुस्तक या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाविषयी बोलता येऊ शकते. अर्थात पूर्वी प्रसिद्ध झालेले किंवा पत्रकारांनी टेबलवर तयार केलेली स्टोरी म्हणून सुद्धा या लेखाकडे बघता येऊ शकते असो आपण यातील नकारात्मक दुर सारूया. 
थोडक्यात पुस्तकाच्या बाबत बोलायचे झाल्यास पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी अजून सकारात्मकच चित्र आहे, असे म्हणता येऊ शकते, हेच खरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

31वर्षे अभिमानाची*

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

वंदन महान शास्त्रज्ञाला