अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे, 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'
पुस्तकाची दुनिया मोठी अफलातून आहे. पुस्तक लेखनाचा प्रत्येक प्रकार आपणस काहीतरी शिववून जातो .ना सी फडके यांनी मराठीत मोठ्या प्रमाणात रुजवलेला निबंध असे म्हणतात तो आपल्या विचारशक्तीला चालना देतो. उत्तम काव्य 'आपणास शब्दाची जादू उलगडून सांगते. कथा कादंबरी हा प्रकार आपले ऊत्तम मनोरंज करतो तर चरित्र तसेच आत्मचरित्र हा प्रकार आपणस आयुष्यचं सुखदुःख सांगतो. एखाद्या कठीण स्थितीत प्रतिभावान माणसे कोणत्या प्रकारे स्थिर चित्र राहिली. . त्यांना याचे काय फळ मिळाले ? हे आपणास समजते. त्यामुळे आपण देखील जर आपणावर तशी स्थिती उद्भवलीच तर शांत राहायचे हे समजून घेऊ शकतो तसेच दुसऱ्याचे दुःख समजून घेण्याची आपली मानसिकता तयारहोण्यासाठी आतमचरित्रे ,चरित्रे मदत करतात असे अनेक मानस शास्त्रज्ञाचे मत आहे, याचा अनुभव घेण्यासाठी या २०२६ वर्षी मी अधिकाधिक चरित्रे आणि आतमचरित्रे वाचण्याचे ठरवले आहे. तर या विशिष्ट हेतू ठेवून सुरु केलेल्या या २०२६ च्या वाचनातले पहिले पुस्तक मी नुकतेच वाचले. ते होते 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'
डायरी ऑफ ऍना फ्रॅंक', एक असे अनुभवकथन जे एका कुमारवयीन अल्पयुषी मात्र प्रगल्भ सशक्त अश्या योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेने तिच्या आयुष्यातील २ वर्षाच्या विदारक स्थिती सांगताना केले आहे असे आपण या पुस्तकाबाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास म्हणू शकतो. .एखाद्या समाजाला विनाकारण खलनायकाच्याभूमिकेत उभे केल्यास काय होऊ, शकते ? याचे हृद्यद्राक चित्र आपण या पुस्तकातून समजते. या फक्त ऍना फ्रॅंक या कुमारवयीन मुलीच्या ८० वर्षांपूर्वी लिहलेल्या आठवणी नाहीत. या आहेत कोणत्याही प्रकारची कट्टरता किती वाईट असते हे सांगणाऱ्या आठवणी. सुमारे २७० पानाच्या या पुस्तकात आपणास दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी ज्यू धर्मियांवर कोणत्या प्रकारे अत्याचार करण्यात आला. हे समजते .
या आठवणी वाचताना आपणास एक कुमारवयीन मुलगी ताणतणावांना कोणत्या प्रकारे सामोरे जाते ? कुमारवयीन भावना कोणत्या प्रकारे असतात. ? युद्ध खरोखरीच कोणत्या समस्येचे उत्तर असू शकते का ? युद्धामुळे जनजीवन कोणत्या प्रकारे विस्कळीत होते. ? या सध्याची स्थिती बघता अत्यंत आवश्ययक असणाऱ्या प्रश्नांनाबाबत विचार करायला भाग पडते. ज्यांना इस्राईल पेलेस्टाईन या सारख्या संघर्षात तेथील मुलेमुली काय अनुभवत असतील याचे वर्णन वाचायचे असेल मात्र त्यांना तेथील अनुभव वाचता येत नसतील त्यांना हे पुस्तक वाचून त्याबाबत मोठ्या प्रमाणात कल्पना सहज येऊ शकते . पुस्तक सुमारे ८० वर्षांपूर्वी लिहलेले आहे तेव्हाचीस्थिती आणि ताची स्थिती पूर्णतः बदलली आहे असे सांगून या पुस्तकाकडे दुर्लक्ष करता येण्यासारखेनाही. किंबहुना मी हा मजकूर लिहीत असताना रशिया - युक्रेन युद्धाला लवकरच ४ महिने पूर्ण होतील अद्याप त्याचे ऊत्तर सापडले नाहीये . अमेरिका आणि युरोपीय राष्ट्र यांच्यात तणाव आहे त्या पार्शवभूमीवर हे प्रश्न अधिकच महत्त्वाचे ठरतात
या डायरीत ऍना फ्रॅंक' फक्त त्यावेळी ज्यू लोकांना कोणत्या हालापेष्टाना सामोरे जावे लागले हेच सांगत नाही. तर त्यावेळी तिला भेटायला येणाऱ्या आणि काही कारणामुळे भेटायला न येऊ शकणाऱ्या व्यक्तींविषयी देखील अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने विचार मांडते. या विचारांमध्ये कुमारवयीन आकर्षण देखील आहे. या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत मूळ डायरीचे संपादन करताना हो भाग मोठ्या प्रमाणात वगळला असल्याचे सांगण्यात आले आहे त्यातही भडकपणा मोठ्या प्रमाणात कमी केला आहे असे सांगण्यात आले आहे मात्र तो पूर्णतः काढून टाकला नसल्याचे या पुस्तकाच्या वाचांतून समजते .आई नई मुलगी यांचे नातेसंबंध कसे असतात? या नटे संबंधात कोणत्या गोष्टीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. या गोष्टी या पुस्तकाच्या वाचनाने उलगडतात .ऍनाने या खेरीज अन्य लेखेन सुद्धा केले त्याची तयारी तिने कशी केली( ज्यात दोन अशंतः लेखन केलेल्या दोन कादंबरी आणि काही निबंध स्वरूपातील लेखन याचा समावेश होतो ) याची माहिती मिळते .स्वतःतील लेखनाचा स्पार्क तिने कसा ओळखला होतायुद्ध संपल्यावर तिने त्याला गती देण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन कसे केले होते. याची देखील माहिती आपणास मिळते . ज्यामुळे अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र लेखिकेचे, मात्र ' योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे, 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'असेच म्हणावे लागते
या आत्मपर कथनाशिवाय ऍना फ्रॅंक' यांनी लिहलेल्या मात्र फारश्या प्रसिद्ध नसलेल्या कादंबरीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा



टिप्पण्या