ह_ड_प_स_र पुणे शहराचे अप्रतिम उपनगर (भाग १ )
आपल्या मनुष्याच्या स्वभाव मोठा विलक्षण आहे. मनुष्य त्याच्या जवळ जे आहे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. आणि दुसऱ्या ठिकाणच्या वस्तूचा शोध घेतो . जर आपण मानवी स्वभावाचे तटस्थ पद्धतीने निरीक्षण केले तर मानव प्राण्याने हा नियम सर्व ठिकाणी वापरला असल्याचे लक्षात येते अगदी आपण राहतो त्या प्रदेशाला सुद्धा हा नियम लावल्याचे आपण सहज दिसून येते. आपण काय इथेच राहतो हा भाग कधीही बघता येईल, या समजुतीतून आपण राहतो त्या शहरातील अनेक भाग ना बघितलेले सुद्धा आपणास अनेक जण सापडू शकतात. किंबहुना आपण राहतो आणि आपण व्यवसाय, नोकरी करतो त्या परिसरात बघण्यास फारसे काही आढळलेले नसल्याने (मुळात तो त्यांचा दोष असतो, त्या भागात देखील अनेक बघण्याचे भाग असतात मात्र रोजच्या जगण्यात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने किंवा तशी दृष्टी नसल्याने त्यांना ते सापडत नाहीत ) शहराच्या इतर भागात देखील तसेच असल्याचे वाटून जाते आणि ते एका मोठ्या खजिन्याला मुकतात.
माझ्याकडून ही चूक होऊ नये म्हणून मी पुणे शहराचे एक अप्रतिम उपनगर असलेल्या हडपसरला नुकतीच भेट दिली. हडपसर उपनगर पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे हा अनुभव मला खूपच काही शिकवून जाणारा होता . हा अनुभव मला सातत्याने मिळावा म्हणून मी या पुढे माझ्या नोकरीच्या साप्ताहिक सुट्टीत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विविध उपनगरात फिरायला जाण्याचे ठरवूनच टाकले आहे असो
हडपसर, एकेकाळी पुणे शहराची परसबाग म्हणून ओळख असलेले, सुप्रसिद्ध बालसाहस कुमार फास्टर फेणे याचा काल्पनिक हा होईना वास्तव्याने अजरामर झालेले पुणे शहराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार म्हणजे हडपसर .अजून देखील ग्रामीण तोंडवळा असलेले पुणे शहराच्या ऐतिहासिक वारस्यात महत्त्वाची भूमिका असणारे उपनगर म्हणजे हडपसर .पुणे शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेत पुणे शहरातून वेगळे काढत स्वतंत्र्यमहानगरपालिका होण्याची शक्यता असणारे उपनगर (अर्थात हडपसर स्वतंत्र महानगरपालिका झाले तर एकही काना मात्रा वेलांटी उकार नसणारे महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे शहर म्हणून त्यास अनोखा मान सुद्धा मिळेल { अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्याने सध्या आपल्या महाराष्ट्रात एकही काना मात्रा वेलांटी उकार नसणारे महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे शहर अस्तित्वात नाहीये } ) म्हणजे हडपसर.
असो तर या हडपसरमध्ये फिरण्यासाठी मी माध्यम निवडले ते सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे . . मी राहतो तेथून जिल्हा न्यायालय हे मेट्रो स्टेशन हाकेच्या अंतरावर असल्याने मी माझ्या राहण्याच्या ठिकाणावरून टू व्हीलरने जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनला गेलो तिथे टू व्हीलर पार्क केली, आणि मेट्रोने प्रवास करत रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरातील पी एम पी.एम एल च्या स्टॉपवर बसचा पूर्ण दिवस चालणारा ७० रुपयाचा पास काढला आणि माझ्या हडपसर पर्यटनाचा खऱ्या अर्तहाने श्रीगणेशा केला. तिथे मला निगडीहून हडपसरला जाणारी बस मिळाली.या बसने मी हडपसर गाव या बसस्टॉप उतरून हडपसरच्या अद्भुत विश्वात प्रवेश केला .तेथून मी हडपसरमध्ये पायी फिरण्यास सुरुवात केली. स्वारगेटहून सोलापूरकडे जाताना हडपसरमधून प्रवास करताना जो उजव्या हाताला लागून जो परिसर आहे (जेथून प्रवास करत आपण सातारा रोडवर जाऊ शकतो ) त्यास समजा आपण उजवे हडपसर असे समजलो आणि जो डाव्या हाताला लागून जो परिसर आहे (जेथून प्रवास करत आपण नगर रोडवर जाऊ शकतो ) त्यास डावे हडपसर समजले तर मी माझ्या या पर्यटनात जे हडपसर बघितले त्यात सुमारे ९७ % भाग हा डाव्या हडपसरचा होता असो. मी हडपसरचा मगरपट्टा दवाखाना, खराडी बायपास आर्वी नगर, काळूबाई मंदिर,रामटेकडी,साडे १७ नळी हडपसर गाडीतळ, रयत शिक्षण संस्थेचे एस एम जोशी हायस्कुल ,कर्णबधिर शाळा तुपे नाट्यगृह कचऱ्याने भरलेला जवळचा
कॅनॉल कृष्णां हॉटेल हडपसर भाजीबाजार आणि याला लागून असलेला परिसर बघितला परतीच्या प्रवासात मला निगडीचीच बस मिळाली मात्र ती आधीच्या पेक्षा वेगळ्या मार्गाने प्रवास करत रामवाडी मेट्रो सटेशनवर आली तेथून जिल्हा न्यायालयाचे मेट्रोचे तिकीट काढत मी माझ्या प्रवाशाची सांगता केली हडपसर म्हंटले की सातत्याने जे बोलले जाते जसे रस्त्याची समस्या, डेनेजची समस्या , वाहतूक कोंडी मला तरी डाव्या हडपसरमध्ये आढळून आल्या नाहीत .कदाचित त्या उजव्या हडपसरमध्येर अस्तिवात असतील.हडपसरमध्ये ज्याविषयी बोलले जाते तो पाणी प्रश्न मी स्थानिकांशी न बोलल्याने खरच अस्तित्वात आहे का, की त्याचा विनाकारण हाइप केला जातो ते समजू शकले नाही असो सोलो ट्रीपमध्ये एखाद्या परिसराचा अभ्यास तो किती आणि कसा करणार तेही माझ्याकडील अपुऱ्या साधनावर . मात्र लेखात सुरवातीला सांगितले तसे मला पुणे शहराची एक नवी ओळख हडपसरमधील या पर्यटनाच्या निमित्ताने झाली हे नक्की .यावेळी मी बघू शकलो नाही ती हडपसरचा भाग अर्थात उजवे हडपसर मी भविष्यकाळात बघितलंच तेव्हा त्या भाचा विशेष संदर्भ घेत संपूर्ण हडपसर विषयी बोलेल तूर्तास इतकेच .

टिप्पण्या