चला स्किझोफेनिया समजून घेउया आणि रुग्णाचा स्वीकार करूया
वाचक मित्र मैत्रिणींनो तुम्हाला जानेवारी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीप प्रभावळकर , सुरेखा कुडची , प्रदीप पटवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेला आणि अजय फणसेकर दिग्दर्शित ‘ रात्र आरंभ ’ हा चित्रपट किंवा मार्च २००४ साली प्रदर्शित अतुल कुलकर्णी , सोनाली कुलकर्णी , देविका दफ्तरदार , तुषार दळवी यांची प्रमुख भूमिका असलेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘ देवराई ’ हा चित्रपट आठवतो का ? मी हे विचारतोय कारण हे फक्त करमणूकप्रधान चित्रपट नव्हते , तर माहितीपटाच्या चौकटीत जाणारे ; मात्र त्याचवेळी माह...