महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ...
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... हे शीर्षक वाचून तुम्ही काहीसे दुखावले गेले असण्याची दाट शक्यता आहे तरी लेखाच्या सुरुवातीलाच त्याबाबद्दल तुमची माफी मागून सांगतो,तुम्ही काहीही म्हणा ही आजची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एस एस सी च्या मराठी भाषा विषयाने यावर जवळपास शिक्का मोर्तब केले आहे. तुम्ही म्हणाल मराठी विषयात ९४००० विद्यार्थी नापास होणे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझणे चा अर्था अर्थी काही संबंध आहे का ? उगीच वडाची साला पिंपळाला जोडून रडायला का सुरुवात करायची ? तर जरा थांबा मी जे म्हणतो ते समजून घेण्यासाठी आपणास आजपासून २९ वर्ष मागे सन १९९७ मध्ये जावे लागेल. माझ्या नाशिकचे भूमिपुत्र कविवर्य कुसुमाग्रज यांनी एका दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी लिहलेल्या सुप्रसिद्ध अश्या ' स्वातंत्र्य देवतेची विनवणी' या कवितेपर्यंत मागे जावे लागेल. या कवितेत त्यांनी परभाषेतही व्हा पारंगत असा उपदेश केलेला असला तरी मराठी भाषेबाबत देखील चिंता व्यक्त केली होती मायमराठी मरते इकडे परकींचे पाय चेपू नका. भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचा...