पोस्ट्स

मे १५, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाहण्याच्या सायक्राटिस्टची चटका लावून जाणारी एक्झिट

इमेज
  "बाबुमोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहाँपनाह... उसे न आप बदल सकते हैं न मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपर वाले की उँगलियों में बँधी है। कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं जानता।  मृत्यूचे वास्तव सांगणारा हा १९७१ साली प्रदर्शित 'आंनद ' या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हा डायलॉग.  आपल्यापैकी प्रत्येकजणच कधीना कधी हे जग सोडून जाणारच आहे. मृत्यू येणार हे निश्चित आहे मात्र तो कधी येणार हे मात्र अनिश्चित आहे. हे दाखवून देतो.  या अनिश्चितेचा फटका १५ मे रोजी सकाळी अनेकांना बसला. कारण होते अनेकांना मानसिक त्रासातून बाहेर काढत जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यास शिकवणारे ठाण्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांची कॅन्सरची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचे निधन झाल्याचे  मी त्यांचे आत्मचरित्र 'शहाण्यांच्या सायकॉस्टीक' हे वाचले आहे. जीवनातील कटू त्रासदायक अनुभवांना शांतपणे सामोरे कसे जायचे हे आपणास त्यातून समजते.  आयुष्यातील अडचणीचा त्रासाचा बागुलबुवा ना उभा करता किंबहुना समोरच्याला त्याबाबत शंका देखील य...