ह_ड_प_स_र पुणे शहराचे अप्रतिम उपनगर (भाग २ )


 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या पुणे शहारला मोठा इतिहास लाभला आहे हे आपणास माहिती आहेच. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने या शहरातील सर्वच भागाचे आपले असे स्वतंत्र्य इंग्रजीत ज्याला युनिक असे म्हणतात असे एक वैशिष्ट आहे.  अगदी शहराची उपनगरे देखील यातून सुटली नाहीत.  अगदी हडपसर असे एकही काना, मात्रा,वेलांटी ,उकार नसलेले साधे सोपे उच्चार असलेले उपनगर देखील यातून सुटू शकले नाही. हे मला समजले ते, आपण  जिथे काम करतो त्या शहराची आपणास माहिती असावी या हेतूने मी सुरु केलेल्या फिरण्यातून . 

तर वाचक मित्र- मैत्रिणींनो मी २९ मार्च आणि ५ एप्रिल रोजी फिरण्याच्या उद्देशाने हडपसरची सैर केली हे आपण जाणताच. पहिल्यावेळी २९ मार्चला स्वारगेटहून सोलापूरकडे जाताना डाव्या हाताला जो हडपसरचा भाग लागेल त्या भागाला भेट दिली होती.त्या विषयीच्या लेखाला  तुम्ही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक आभार .या भेटीला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यामुळे उर्वरित हडपसरला भेट देण्याची माझी  ताकद

वाढली आणि ५ एप्रिल रोजी स्वारगेटहून सोलापूरकडे जाताना उजव्या  हाताला जो हडपसरचा भाग लागेल त्या भागाला भेट दिली .  माझे आजचे लेखन या पुणे -सोलापूर रस्त्यावरील उजव्या हाताच्या हडपसरच्या भागसाठी 

यंदा माझ्या रूमपासून हडपसरमध्ये जाण्यासाठी मी नेहमीचा मार्ग न निवडता थोडा वेगळा मार्ग निवडण्याचे ठरवले. त्यानुसार स्वारगेटला पी एम पी  एम एल  चा एका दिवसाचा  पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात चालणारा  एका दिवसाचा ७० रुपयाचा  पीएमपीएमएलचा पास काढला . पस काढल्यावर स्वारगेटहून  बसने  प्रवास करत पहिल्यांदा कात्रज गाठले.आणि थेथून बस क्रमांक १८८ च्या मार्फत मी हडपसरकडे प्रवास सुरु केला या बसने मी हांडेवाडीला उतरलो आणि पायी पायी हांडेवाडीमध्ये फिरायला सुरुवात केली. हांडेवाडी बघून झाल्यावर बस क्रमांक १९२ च्या मार्फत हडपसरच्या गाडीतळावर आलो. तिथे थोडेसे खाणे झाल्यावर बस क्रमांक १९५ च्या मार्फत उंड्री आणि पिसोळी बघून पुन्हा बस क्रमांक १८८ च्या मार्फत  हडपसर गाठले .त्यानंतर बस


क्रमांक १९२ च्या मार्फत वडाची वाडी ला भेट देऊन पुन्हा त्याच बसने हडपसरला परत आलो. त्यानंतर कोंढवा मार्गे  हडपसरहुन  कात्रजला येणाऱ्या बसने प्रथम कात्रजला आणि तेथून स्वारगेटला येत माझा प्रवास संपवला 

हडपसरचा हा भाग ग्रामीण आणि शहरी भाग यांच्या एकत्रित परिणाम झालेला भाग म्हणून ओळखता येईल असा होता .हडपसरच्या  समस्या म्हणून ज्या ओळखल्या जातात त्यां सर्व मला  दिसले.  मी हांडेवाडीत सकाळी ९ ते साडेनऊ  या दरम्यान होतो.  या वेळात सुरुवातीलाच १० ते १५ मिनिटात मला २२ टँकर दिसले  इतक्या कमी वेळात इतके टँकर दिसल्याने मी पुढे मोजायचेच सोडून दिले. अरुंद रस्ते सर्वत्र होते. अगदी हापसरच्या मगर गल्ली या मुख्य भागात सुद्धा मला जेमतेम दोन मोठी वाहने  जाऊ शकतील अशी स्थिती आढळली .विशेष म्हणजे याच मगर गल्लीच्या एका टोकावर पणे महानगरपालिकेचे  हडपसर मुंढवा  क्षेत्रीय कार्यालय आहे  बस क्रमांक १८८ ने फिरताना सत्य परम ते आय बी एफ या दोन बस स्टॉप च्या दरम्यान रविवार दुपारची वेळ असून देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा समान करावा लागला . परतीच्या प्रवाश्यात फिरताना फातिमा नगर ते श्रीराम चौक याच परिसरात मला मोठे रस्ते आढळले या शिवाय पी एम पी एम एल बस क्रमांक १९२ आणि १९५ मधून प्रवास करताना जो काही भाग लागला असे चिंतामणी नगर ससाणे नगर बसस्टोप महामंददवाडी (महादेववाडी ) सय्यदनगर  आदी सर्व ठिकणी हीच स्थिती आढळली मात्र छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ससाणे नगर या बस स्टॉपपाशी थोड़ा मोठा रास्ता दिसला हीच  काय ती समाधानाची बाब 


 मी फिरायला रविवार त्यातही दुपार निवडली होतीतरी देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी होती ,एखादी गाडी जर रस्त्यात काही कारणाने बंद पडली तर ट्राफिक जॅम होणारच अशी स्थिती मला आढळली.सोमवार ते शनिवारच्या तुलनेत रविवारी साधारणतः रस्त्यावर गर्दी कमी असते. तसेच सकाळ आणि संध्याकाळच्या तुलनेत दुपारी गर्दी कमी असते हे लक्षात घेता गर्दीच्या काळातील अडचणीची कल्पनाच केलेली बरी.  पिसोळी गावात मला रस्त्यावर वास येणारे पाणी वाहताना दिसले .पिसोळी आणि वडाची वाडी ही  गावे तर पुणे शहरातील एखादा भाग जसे , सहकारनगर, जनता वसाहत हे भाग  भाग मोठे वाटावे इतकी छोटी आहेत , असो.  मी फिरलेल्या उंड्री,पिसोळी, हांडेवाडी, वडाची वाडी, या गावामध्ये उंड्री आणि हांडेवाडी हे गावच काय ते मोठे आहे त्यातही हांडेवाडी गाव सगळ्यात मोठे असल्याचे माझे निरीक्षण आहे.  पिसोळी आणि वडाची वाडी ही  गावे माझे जन्मगाव असलेल्या नाशिक मधील एखादा आदिवासी पाडा  असावा अशी आहेत .या गावात मला मोठ्या इमारती जवळपास नाहीच म्हणता येतील अश्या आढळल्या  हांडेवाडी आणि उंड्रीमध्ये मला पुणे शहराच्या जवळ आहे ग्रामीण भाग असल्याने बांधा हवे तसे पुढेच पुढे बघू या दृष्टिकोनातून उंचच उंच बिल्डिंग बांधलेल्या आढळल्या .जर दुर्ददवाने  आगी सारखीच घटना घडलीच तर या छोट्या  वाहतुकीने भरलेल्या रस्त्यावरून आपत्तकालीन वाहने कशी जातील त्यांचे त्यांनाच माहिती 


आपल्याकडे भारताच्या आर्थिक स्थितीचे वर्णन करताना भारतात इंडिया आणि भारत असे दोन देश एकाच जमिनीवर एकाच वेळी  नांदत असल्याचे सांगितले जाते माझ्या हडपसरच्या फिरण्यातून मला ही बाब पुन्हा एकदा दिसून आली  असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .पुणे शहरातून सोलापूरकडे जाताना  लागणाऱ्या डाव्या  हडपसरला आपण इंडियन  हडपसर म्हणू शकतो जेथील जमिनीतून सोन्याचा धूर येत आहे.त्याच वेळी उजव्या हडपसरला आपण भारतीय हडपसर म्हणू शकतो जे अजूनही मूलभूत सोयीसुविधांची झगडते आहे.  पुणे शहरात  सुद्धा इतर ठिकाणी जसे जनता वसाहत,पर्वती गाव या भागापासून सहकार नगर हा भाग फारसा लांब नाही तसेच  याच सहकारनगर भागापासून अप्पर देखील फारसे लांब नाही मात्र सातारा आणि सिंहगड रोडने वेगळे केलेल्या या भागामध्ये जसा फरक दिसतो याही पेक्षा मोठा फरक मला उजव्या आणि डाव्या हडपसरमध्ये अनुभवयास येतो ही दरी कमी होणे आवश्यक आहे दव करो आणि मी पुढे जे पुणे शहर बघणार आहे त्यात हि दारी दिसणार नाही 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव