तीन दिवस, तीन स्थळे रेल्वेमार्फत ... 


व्यक्तींनी त्यांच्या धावपळीच्या  आयुष्यात काही वेळ तरी त्यांच्या छंदासाठी द्यावा.छंदासाठी दिलेला वेळ आणि खर्च केलेला पैसे ही वेळ आणि पैशाची उधळपट्टी नसते.  तर धावपळीच्या आयुष्यात जगताना दमछाक होऊ नये, रोजच्या आयुष्यात जगताना सामोरे जावे लागणाऱ्या ताणतणावांना सहजतेने  सामोरे जाता यावे,  म्हणून ताकद मिळावी यासाठी केलेली ती गुंतवणूक असते, असे अनेक  मानसशास्त्रज्ञ सातत्याने सांगताना आपण ऐकतो, बघतो.  हिंदी आणि मराठी भाषेत छंदाचे महत्व सांगणारे 'जब वी मेट' सारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर आपल्या रोजच्या आयुष्यातील हेच छंदाचे महत्त्व लक्षात घेत रोजच्या धावपळीतून काहीसा ब्रेक घेत काही दिवसापूर्वी  मी ३ दिवसात तीन स्थळे बघितली. विशेष म्हणजे माझ्या नेहमीच्या एसटी बस चा माध्यमातून ही स्थळे बघण्याच्या ऐवजी मी ही स्थळे बघितली ती रेल्वेच्या माध्यमातून. 

पुणे रेल्वे स्थानकातून रेल्वे सुटण्याची वेळ,  स्थळ दर्शनाचा कालावधी, माघारीचा कालावधी लक्षात घेत साधारणतः सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे स्थानकावर परत येता येईल, असा विचार करत मी ही स्थळे निवडली होती. मी ३ दिवस ३ स्थळे या मोहीमेअंतर्गत लोणावळा, दौड आणि सातारा या शहरांना भेटी दिल्या. या प्रवासादरम्यान मला पुणे परिसराची मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली .जी कदाचित मला पुस्तके आणि  न्यूजपेपरच्या वाचनाने मिळणे काहीसे अवघड झाले असते असो एक मुद्दा सांगायचा काहीसा राहून गेला तो म्हणजे या प्रवासासाठी मी जी रेल्वेची तिकिटे काढली ती रेल वन या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून .  रेल्वेचे हे  अधिकृत ऍप्लिकेशन खूपच उपयोगी आहे त्याविषयी मी नंतर स्वतंत्र्यपणे बोलणारच आहे असो  तर वाचक मित्र आणि मैत्रिणींनो पुणे परिसरातील नागरीकरण कसे झाले आहे ? रेल्वेचा विस्तार करायचा असल्यास काय काय अडचणी आहेत तसेच जमेच्या बाजू कोणत्या आहेत ? पूर्वी उभारलेल्या कोणत्या गोष्टी सध्या मोठ्या प्रमाणात कालबाह्यझाल्या आहेत ? पुणे परिसरात रेल्वेच्या वाहतुकीच्या संदर्भात कोणत्या गोष्टी आहेत ? पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्लॅटफॉर्म वर येताना काय अडचणी येतात.  यासारख्या अनेक गोष्टींची माहिती मला यातून मिळाली. 

मी लोणावळ्याला जेव्हा प्रवास केला.  तेव्हा मला आकुर्डी रेल्वे स्टेशन नंतर पुणे-  लोणावळा या दरम्यान जास्तीचे रूळ टाकण्यासासाठी करावयाचा कामाची सुरुवात म्हणून अनेक ठिकाणी जागा समतल सपाट करणे आदी कामे दिसली तसेच रूळ टाकंबे सियाचे व्हावे यासाठी ताब्यात घेतलेली जागा देखील दिसली आकुर्डी ते पुणे स्टेशन या शहरातील टप्प्यात मात्र नवीन रेल्वे रूळ टाकण्याचे काम काहीच म्हणजे काहीच नाही असे म्हंटले तरी चालू शकते. बेगडेवाडी या रेल्वे स्टेशनममधून जी जेव्हा प्रवास केला तेव्हा दोनच प्लॅटफॉर्म असून देखील त्यांच्यातील फरक बघता नवीन प्लॅटफॉर्म या स्टेशनमध्ये उभारल्यास एका प्लँटफॉर्म वरून दुसऱ्या प्लँटफॉर्मवर जाणे किती त्रासदायक असू शकेल असा विचार माझ्या मनात येऊन गेला असो रेल्वेचे इंजियर एक्स्पर्ट आहेत ते य समस्येतून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील 

मी दौड शहरसाठी जेव्हा प्रवास केला.  तेव्हा मला लक्षात आले की हडपसर परिसरात किती मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. हडपसरला स्वतंत्र्य महानगरपालिका करावी असे सातत्याने सांगितले जाते जरखरोखरीच हडपसरला स्वतंत्र्य म्हनारपालिकाका झालीच तर सध्याच्या हडपसर परिसरात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या वानवडी, हडपसर आणि रामटेकडी या प्रशासकीय भागांसह असण्या कोणता नजीकचा भाग या महानगरपालिकेचा हिस्सा होऊ शकतो .किंबहुना अधिक वास्तवदर्शी बोलायचे झाल्यास नागरी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी झालाच पाहिजे हेयाची काही प्रमाणात मला आयडिया आली.  तसेच आता रेल्वे मोठ्या प्रमाणात इलेट्रीक होत असताना घोरपडी परिसरात उभारलेल्या मोठं मोठ्या डिझेलच्या टाक्या आता कितपत उपयोगी ठरतील असा एक प्रश्न मनात या निमित्ताने चमकून गेला. मला माहिती आहे कि ज्या ठिकाणी पॅसेन्जर रेल्वेच्या मेन्टन्स चे काम चालते त्या ठिकाणी गाड्याच्या छताची दुरुस्ती करणे सोईस्कर व्हावे त्या ठिकाणी ओव्हरहेड वायरमुळे होणारा  त्रास लक्षात
घेता रल्वेची वाहतूक करणे सोईस्कर व्हावे या साठी डिझेल इंजिनचा वापरावे लागते मात्र हा मुद्दा विचारत घेतला तरी सध्याची घोरपडी येथील डिझेल टाक्यांची जागा गरजेकपेक्षा मोठी आहे ती जागा मोकळी केल्यास अनेक प्रश्न सुटतील असे मला  वाटते . दौड प्रवासादरम्यान रेल्वे वेळेवर धावत आहे. तिला उशीर झालेला नाही असे भासवण्यासासाठी, रेल्वेकडून करण्यात येणाऱ्या एका हातचलाखीचा  पुरावा देखील मला अनुभवता आला असो 

मी सातारा येथे फिरायला गेलो असतात रेल्वेच्या  बाबतीत हा भाग काहीसा मागे पडल्याचे मला दिसले.  या ठिकाणी अनेक रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे.  तसेच या परिसरात नागरीकरणाचा वेग काहीसा कमी आहे असे दिसले.  सातारा रेल्वे स्टेशनपासून शहरात येण्याची आणि शहरातून रेल्वे स्टेशनवर जाण्याची सुविधा खूपच म्हणजे अगदी खूपच त्रासदायक आहे.  बाकी सातारा रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वारे मात्र खूपच ऊत्त म प्रकरे बांधले आहे मराठा हिस्ट्रीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या  शहरात आपण आलेले आहोत याची साक्ष आपणास रेल्वे स्टेशनच्या किल्ला सदृश्य प्रवेशद्वारांमुळे आपणास होते. 

सार्वजनिक परिवहन वाहतुकीमुळे रस्त्यावरील अनावश्य्क गर्दी कमी होते त्यामुले वाहतूक कोंडीमुळे जाणारा आपला वेळ देखील कमी होतॊ तसेच समाजच्या वेगवेगळ्या स्तराचे दर्शन होते आपल्या शहरात कोणत्या भागातून किती लोक येतात हे समजते उदाहरणार्थ दर संध्याकाळी साडेसात ते रात्री पावणेनऊ या दरम्यान पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लँटफॉर्म क्रमांक १ वर  उभे राहा आठवड्यातील सातीही  दिवस मिळून एकूण किती बिहारी  नागरिकांनी पुण्य नागिरचा निरोप घेतला याची खरीखुरी आकडेवारी मिळेल तरी जातात माझे पानास इतकेच सांगणे आहे की माझ्यासारखे तुम्हीही सार्वजनिकवाहतुकीच्या साधनाने फिरा मग जाणार ना सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाने फिरायला 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक