शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ...
पुणे शहरात दोन वर्षापूर्वी झालेल्या, 'बडे बाप कि बिगडी हुवी संतान' या वर्गवारीत सहज मॉडेल अश्या पर्सो कार दुर्घटनेत अटकेत असेलेल्या वडिलांना जमीन मिळाल्यावर झालेल्या जल्लोष्याचे फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली अनेकांनी सोशल मीडियावर त्याबाबत तीव्र नापसंती दर्शवली. .मात्र हे करताना हे नागरिक हे विसरले की,याच प्रकारची घटना पुणे शहरात सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी कटाची संपूर्ण माहिती पोलिसाना दिल्यामुळे पोलिसांनी ज्यास शिक्षेतून सूट दिली त्या आरोपीची देखील कुटुंबियांनी याच प्रकारची भव्य मिरवणूक काढली होती .जणू त्यांनी निष्पाप पुणेकरांना नव्हे तर पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घेतले होते . त्यामुळे माझ्या मते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या घटनेचे वर्णन 'शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ... असेच करावे लागेल . मी बोलत आहे जोशी- अभ्यंकर खून खटल्यात माफी मिळालेल्या सुहास चांडक याच्या विषयी. सुहासचा कुटंबीयांनी देखील त्याची याच प्रकारची मिरवणूक काढली होती. इंटरनेटवर ...