रेल्वेचे काहीसे उशिरा पडलेले मात्र अतिशय उत्तम पाऊल 'रेल वन ऍप्लिकेशन'

 


आपल्या  भारतातील प्रशासन मोठे अजिब रसायन आहे.नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना करताना संबंधित यंत्रणा नक्की कोणता विचार करतात ? याचा अंदाज बांधता येणे भल्याभल्या देखील शक्य होणार नाही अश्या प्रकारचा या यंत्रणांच्या कारभार असतो.  मात्र नंतर आलेले अनुभव लक्षात घेत  या उपाय योजनेत मोठ्या प्रमाणात बदल होतात हेही तितकेच खरे.  हे बदल बघितले तर हे बदल आधीच का केले नाहीत ? असा प्रश्न सर्वसाम्यांना नक्कीच पडेल असे या यंत्रणेचे काम असते. अगदी रेल्वेसारख्या जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतुकीचा  उपक्रम देखील या कचाट्यातून सुटलेला नाही रेल्वेचे 'रेल वन हे ऍप्लिकेशन'  हे याचे एका उत्तम उहदाहरण म्हणता येईल 

रेल्वेचे अनरिझर्वड तसेच रिझर्वेशन करणे , गाड्यांची सध्याची स्थिती बघणे आपल्या रिझर्वेशनची स्थिती बघणे,पास काढणे दोन स्टेशन दरम्यान किती ट्रेन धावतात त्यांची डब्यांची स्थिती काय आहे ? प्रवासादरम्यान खाण्याची सोय करणे,रेल्वेकडून काही मदत मागवणे, रेल्वेच्या कारभाराबाबत तक्रारी करणे, प्रवासादरम्यान कंटाळा येऊ नये म्हणून मनोरंजनाची सोय करणे, रेल्वेबाबतची छान छान  माहिती समजावून घेणे या सारखी असंख्य कामे या एका छोट्याशा अप्लिकेशनद्वारे करता येतात. सध्या हे ऍप्लिकेशन इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपल्बध आहे 

रेल्वेचे अधिकृत ऍप्लिकेशन असलेल्या यू टी एस या जनरल तिकिटे काढणाऱ्या तसेच रिझर्वेशन करणाऱ्या आय आर सी टी सी  सह अधिकृत नाही मात्र मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्हेअर इज माय  ट्रेन सारख्याअसंख्य ऍप्लिकेशनचे एकत्रित स्वरूप म्हणजे हे ऍप्लिकेशन होय.  या ऍप्लिकेशनमुळे रेल्वेविषयी विविध कामे करण्यासाठी जसे जनरल तिकीट काढणे, रिझर्वेशन करणे, आपल्या गाडीची स्थिती काय आहे हे बघण्यासासाठी  वेगवेगळी ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करून मोबाईलची रॅम खाण्याची पद्धत इतिहास जमा झाली आहे पूर्वी ही  कामे करण्यासाठी स्वतंत्र अप्लिकेशन डाउनलोड करावे लागत असे असो 

मी हे लिहण्याचा आधी हे ऍप्लिकेशन अनेकदा वापरले आहे .माझा या बाबतचा अनुभव खूपच उत्तम म्हणजे दहापैकी मार्क देण्याचे झाल्यास दहापैकी दहा देण्याच्या गुणवत्ते\चा आहे. हे ऍप्लिकेशन  रेल्वेस्टेशनचा   १०० मीटर अंतरापासून प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे गाडीत हे अप्लिकेशन न वापरता येणे आणि ऍप्लिकेशन वापरण्यासाठी जी पी एस \चालू  ठेवायला लागणे या दोन गोष्टी सोडल्या तर हे ऍप्लिकेशन वापरणे खूप ऊत्तम आहेत .माझ्या माहितीत  जी पी एस वापरणे म्हणजे खासगी माहितीवर दरोडा समजणारे काही लोक आहेत

त्यांना जी पीएस ची सक्ती हा मुद्दा भयानक वाटू शकतो मात्र या व्यक्ती सोडल्या तर ज्यांना फिरण्याची आवड आहे त्यांनी हे ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करणे रोज अंघोळ करणारे जसे आवश्यक आहे तसेच आवश्यक आहे असे मला वाटते. 

मी लेखाच्या सुरुवातीला सांगितले तसे हे ऍप्लिकेशन वापरताना हे बदल आधीच का केले नाही ?रेल्वे प्रवाश्याच्या सर्वच  गरजा त्यांना माहिती नव्हत्या का ? त्यांनी प्रवाश्याना रेल्वे विषयक कामे करण्यसाठी वेगवेगळी ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये  का इंस्ट्रॉल करायला लावली असे प्रश्न मात्र मनात येतात असो उशिरा का होईना चांगली सोय झाली हे महत्ताचे असे समजून  याचा आनंद घेणे हेच सुख . 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक