भारत म्यानमार मैत्रीचा सेतू आणि बॉलिवूड
माझ्या जपान आणि बॉलिवूड यांच्यातील सहसंबंध दाखवणाऱ्या गाण्याविषयीच्या लेखानंतर अनेकांनी मला या सारखी अजून काही या सारखी गाणी असतील तर त्याविषयी तू लिहिलेले मला वाचायला आवडेल असे सांगितल्याने त्या विषयी सांगण्यासाठी प्रस्तुत लेखन .
मित्रांनो या प्रकारचे अजून एक गाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरवातीला चित्रीत करण्यात आले.1949 साली प्रदर्शित झालेल्या पतंगा या चित्रपटातील 'मेरे पिया गये हे रंगून, वहासे किया हे टेलिफोन' हे राजिंदर कृष्ण लिखित आणि सी रामचंद्र यांच्या संगिताने सजलेले हेच ते गाणे.शमशाद बेगम आणि सी रामचंद्र यांनी गायलेल्या या गाण्यातून नवरा बायको यांच्यातील अतूट प्रेम दाखवले गेले आहे.
सव्वा चार मिनीटांच्या कृष्णधवल गाण्यातूनच नव्हे तर पतंगा या चित्रपटातून त्यावेळच्या भारताच्या मित्र राष्ट्रांबाबत खुप माहिती मिळते.भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले तर म्यानमारला 4 जानेवारी 1948 ला स्वातंत्र्य मिळाले .दोन्ही देशातील राजकर्त्यांना ब्रिटीश राजवटीत लयास गेलेल्या आपल्या देशाला विकसीत करण्याचे आव्हान होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात पंडीत जवाहरलाल नेहरू, तर म्यानमार ने आंग सांग यांच्या नेतृत्वात वाटचाल सुरू केली. दोघांना आप आपल्या देशाला प्रगतीपथावर नेयचे होते.त्यासाठी शांतता हवी होती. ब्रिटीश राजवटीत भारताच्या पंडीत जवाहरलाल नेहरु आणि म्यानमारच्या आंग सांग यांनी लंडनमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेताना एकाच खोलीमध्ये तीन वर्ष वास्तव्य केल्याने दोन्ही देशातील प्रमुख हे वैयक्तिक स्तरावर मित्र होते. या समान धाग्यामुळे भारत आणि म्यानमार या दोन देशामध्ये दाट मैत्री होती. याचे प्रत्यंतर संपुर्ण पतंगा चित्रपटात जाणवते. तर संपुर्ण चित्रपटाचे सार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'मेरे पिया गये हे रंगून, वहासे किया हे टेलिफोन' या गाण्यात तो अजूनच ठळक होते.
भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रतिबंब म्हणून आपण या चित्रपटाकडे आणि या गाण्याकडे बघू शकतो.या खेरीज या काळातील चित्रपटाचा विचार करता 1955 साली प्रदर्शित झालेल्या श्री 420 या चित्रपटातील ' मेरा जूता है जपानी,....फिर भी दिलहै हिंदूस्थानी या गाण्याकडे आपण त्या वेळच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचे प्रतिबिंब म्हणून बघू शकतो. या गाण्यातील एका मुद्द्यावर मी नुकतेच लिहले होते, या गाण्यावर मी सविस्तर पुढे लिहिलच,तो पर्यत सर्वांना माझा नमस्कार

टिप्पण्या