रफी साहब, आपने मराठी को किरणे खूबसूरत चांद , दिये मान गये !
दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.काही कामानिमित्त पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रोने प्रवास करत होतो. वेळ दुपारची असल्याने फारशी गर्दी नव्हती. माझ्या शेजारीच एक सत्तरीचे आजोबा प्रवास करत होते. आजोबानी मेट्रोच्या संगीताच्या नियमाला बगल देत हेडफोन न वापरता, मोबाईलवर गाणी लावली होती. त्यामुळे त्या गाण्याच्या आस्वाद मला देखील घेता आला. आजोबानी शोधिसी मानव लावुनी अंतरी, प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, हा छंद जीवाला लावी पिसे, हा रुसवा सोड सखे, हे मना आज कोणी बघ तुला या सारखी गाणी आपल्या मोबाईलवर लावली होती
आजोबांची गाणी शांत संगीताची आणि सहज गुणगुणता येतील या प्रकारच्या मराठी भाषेतील असल्याने मी आजोबांना गाणी आवडल्याचे सांगितलेत्यावर त्यांनी स्मितहास्य देत,ही सगळी गाणी पंजाबी मुसलमान असलेल्या मोहंमद रफी यांनी गायलेली आणि श्रध्येय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाऊ श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत अशी माहिती पुरवली. त्यांना शिवाजीनगर येथे जायचे असल्याने ते उतरून गेले
मात्र त्यांनी एका नव्या वादळाला जन्म दिला . हे वादळ होते मराठीला किती समृद्ध वारसा आहे आणि तो समृद्ध करण्यासाठी मुळात मराठी भाषिक नसणाऱ्या व्यक्तींनी हो समृद्ध करण्यासाठी किती मोठे योगदान दिले आहे. या सारख्या विचारांचे
मात्र त्यांनी एका नव्या वादळाला जन्म दिला . हे वादळ होते मराठीला किती समृद्ध वारसा आहे आणि तो समृद्ध करण्यासाठी मुळात मराठी भाषिक नसणाऱ्या व्यक्तींनी हो समृद्ध करण्यासाठी किती मोठे योगदान दिले आहे. या सारख्या विचारांचे
पुढे मोहमद रफ़ी यांनी मराठीत गायलेल्या गाण्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेतली असता मोहंमद रफी यांनी अत्यंत मोजकी मात्र ऐकताना मन कितीही निराश असलेलं तरी ती निराशा कुठच्या कुठे पळवून लावणारी गाणी गायलेली मला दिसली हसा मुलांनो हसा प्रकाशातले तरी तुम्ही, खेळ तुझा प्रभू न्यारा तुझा रे, आग पोरी सांभाळ दर्याला तुफान आहे लई भारी,विरले गीत कशी झाली मनाची शकले, नको ती आरती नको ती पुण्यमाला हि त्यापैकी काही प्रमुख गाणी म्हणता येतील
माझ्या अत्यल्प माहितीनुसार ज्यांची मातृभाषा मराठी नाही मात्र ज्यांनी मराठीतील उत्तमोत्तम गाणी गायली आहेत. अश्या लोकांची यादी केल्यास त्या मध्ये मोहंमद रफी खेरीज सुमित राघवन अशी अत्यंत तुरळक व्यक्तिमत्वे दिसतात.त्यातही मोहम्मद रफी यांची कारकीर्द ज्या काळात बहरली तो काळ विचारात घेतात्यां नी आपल्या मराठी साठी किती भरीव योगदान दिले आहे, हे समजते स्वर्गीय गान कोकिळा लता मंगेशकर यांनी विविध भाषेत असंख्य गाणी गायली आहेत मात्र त्या मूळच्या मराठी भाषिक (कोकणी भाषा माझ्यामते मराठीची डायलेट्स आहे त्यामुळे कोकणी भाषिक लोकांची मातृभाषा मराठीच समजायला हवी,त्यामुळे मूळ गोव्यातील असून देखील त्या मराठी भाषिकच आहेत ) आहेत तर मोहमदद रफीयांची मातृभाषा पंजाबी आहे त्यामुळे या दोघांची तुलना होणे शक्यच नाही .
एक पंजाबी मातृभाषा असलेला धर्माने मुस्लिम असलेला मराठीची काहीही ओळख नसलेला व्यक्ती सुद्धा आपल्या मराठी भाषेच्या प्रेमापोटी तिला किती समृद्ध करतो हे समजण्यासाठी मोहंमद रफी यांनी मराठी भाषेत गायलेली गाणी नक्की ऐका गाणी ऐकल्यावर माझ्या सारखेच तुमच्याही तोंडातून हीच भावना व्यक्त होईल याबाबत माझ्या मनात शंका नाही , आणि ती म्हणजे रफी साहब, आपने मराठी को किरणे खूबसूरत चांद , दिये मान गये !




टिप्पण्या