जपानी कार्य कुशलतेवर अचूक भाष्य करणारे बॉलीवूड मधील गाणे
व्यवस्थापन क्षेत्रात जपान आणि जपानी तंत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जपानी कारखन्यात तयार झालेल्या वस्तू कितीही काटेकोरपणे तपासणी केली तरी चूक सापडणार नाही या प्रमाणात अचूक झालेल्या असतात, असे सहजतेने म्हटले जाते. जपानने हा मान मोठ्या कष्टाने मिळवला आहे.,हे सांगायला कोणत्याही तज्ञ व्यक्तीची आवश्यकता नसावी.सातत्याने होणाऱ्या भुकंपाला सक्षमपणे तोंड देत दुसऱ्या महायुद्धानंतर शद्बश: राख झालेल्या देशाने ही गौरवास्पद कामगिरी केली आहे.
जपानची ही कामगिरी किती उच्च दर्जाची आहे,हे आपण 1955 साली आलेल्या श्री 420 या चित्रपटातील राज कपुर यांच्यावर चित्रीत झालेल्या 'मेरा जूता है जपानी....फिर भी दिल है हिंदुस्थानी या सव्वाचार मिनीटात आपण सहजतेने बघू शकतो. या गाण्यातील अन्य वाक्यांचा संदर्भ घेतल्यास आपणास त्या वेळच्या भारताच्या परराष्ट्र धोरण आणि जागतिकीकरणाविषयी बोलता येवू शकते जसे पॅट इंग्लडची आणि टोपी रशियाची मात्र मन मात्र पुर्णत: भारतीय या प्रमाणे. मात्र ते आपण क्षणभर बाजुला ठेवून परत येवूया जपानवर.
चित्रपटाची पटकथा आणि इतर तांत्रीक बाबींचा विचार करता एखाद्या कथेवरुन निर्मात्याचा मनात चित्रपट तयार करावा,असा विचार येवून आंतीम चित्रपट तयार होण्यास सहज दिड ते दोन वर्ष लागतात .हे गाणे ज्या चित्रपटातील आहे तो चित्रपट अर्थात श्री 420प्रदर्शित झाला 1955 साली. म्हणजे या गाण्याचा विचार करता ते 1954/1953 साली चित्रपटात घेण्याविषयी ठरले असणार, आणि येथेच आपणास जपानच्या कार्य कुशलतेचा परीचय येतो 1945साली पुर्णत: बेचीराख झालेला जपान पुढील 7 ते8 वर्षात इतकी झेप घेतो की त्याच्याविषयीचा उल्लेख बॉलिवूडला आपल्या चित्रपटात करावासा वाटतो. याबाबत जपानी लोकांचे करावे तितके कौतूक कमीच आहे, असे मला वाटतेयं .आपणास काय वाटते.
टिप्पण्या