नात्यातील ढोंगीपणा उघड करणारे गाणे

     आपल्या भारतातील चित्रपटांतील महत्तवाचा भाग म्हणजे त्यातील गाणी. जगात इतर भागातील चित्रपटांमध्ये गाणी शक्यतो आढळत नाही. भारतीय चित्रपटांत प्रामुख्याने आढळणाऱ्या या गाण्यातून मानवी जीवनाच्या सर्वच अंगाना स्पर्श केलेला आढळतो.  या गण्यातून ज्या प्रकारे मानवी आयुष्यातील रंजकता, सकारात्मक बाजू दाखवण्यात येते त्याचप्रमाणे मानवी आयुष्यातील दाहकता कटु सत्य मानवी आयुष्यातील वास्तविकता देखील तितक्याच प्रभावीपणे दाखवण्यात भारतीय चित्रपटातील गीते यशस्वी झालेली दिसतात.
     याच मानवी आयुष्यातील कटू बाजू दाखवणारे एक प्रसिद्ध गाणे म्हणजे श्रेष्ठत्तम  बॉलीवूड चित्रपट निर्माते,दिग्दर्शक, अभिनेते  गुरुदत्त निर्मित  प्यासा या चित्रपटातील 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है!' हे गाणे .तसे बघायला गेलो तर प्यासी मधील सर्वच गाणी मानवी आयुष्यातील ऋणात्मक बाजू आपल्या समोर आणत असली तरी मला 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हे' हे गाणे विशेष मनाला भावते.
    मानवी नाते मुख्यत: स्वार्थावर अवलूंबन असतात.त्यात जिव्हाळा ममत्व यांचा फक्त दाखवण्यपुरताच संबंध असतो‌.रोजच्या जगण्यात लोक कामापुरतीच स्तूती करतात.
तेव्हा आपल्या कलाकृतीची कार्याची दखल समाजाने घेतली नाही म्हणून दुःखी होण्यात काहीही अर्थ नाही. लोक स्वार्थापोटी मानवी नात्याला देखील पायडळी तूडवतात. या समाजाने आपल्या कलाकृतीची, कार्याची दखल घेतली म्हणून हुरळून जाण्यात देखील काही अर्थ नाही ,हे व्यक्तीने कायम लक्षात ठेवावे तसेच समाज अनेकदा बहुतांशवेळा एखाद्याल पहिल्यांदा झिडकारतो नंतर कालांतराने डोक्यावर देखील घेतो.मनुष्य मृत झाल्यावर देखील समाजाला त्या व्यक्तीचे महत्त्व समजू शकते‌.अर्थात त्या व्यक्तीला त्याचा काहीही फायदा होत नाही‌. हे कटु वास्तव या गाण्यातून  आणि त्यानंतर लगेचच चित्रीत झालेल्या प्रसंगातून दाखवण्यात आले आहे.
    या 5 मिनीटांच्या साहिर लूधीयानवली लिखित अणि महोमद्द रफी यांनी गायलेल्या गाण्याला संगीत दिलेले आहे‌. ते एस‌ डी. ब्रमन यांनी .या गाण्याचा सुरवातीला कवी विजय (गुरूदत्त) नाट्यगृहाच्या दरवाज्यात दोन्ही हात लांब करुन येशू खिस्ताचा पुतळा ज्या पध्दतीने उभा असतो. तसे उभा राहिलेला दिसतो त्याचवेळी नाट्य गृहात अंधार तर मागे लाईट दाखवण्यात आला आहे.गुरुदत्त यांचा चेहऱ्याचा क्लोज अप घेण्याचा प्रघात या गाण्यात देखील वापरण्यात आला आहे गाण्यातील संगीत सुरवातीला काहीसे सौम्य, निराशता दर्शवणारे आहे‌ तर गाण्याचा अखेरीस हे संगीत अधिक तीव्र होत जाते .संगीता बरोबरच गाण्याचे बोलसुद्धा सुरवातीला संथ आणि नंतर जलद गतीने होतात आणि गाणे क्षणार्धाण निराशेतून संतापात,उद्गेगात बदलते‌ एकाच गाण्यात दोन वेगळ्या भावाना दाखवण्यात गाणे यशस्वी होते
  तस बघायला गेले तर सगळा प्यासा हा चित्रपट आपणास आयुष्यातील दांभिकता स्पष्टपणे दाखवून देतो. त्यामुळे आपण तो बघायलाच पाहिजे मात्र ज्यांना संपुर्ण चात्रपट बघणे काही कारणाने शक्य नाही‌, त्यांनी चित्रपटाचे सार समजण्यासाठी हे गाणे तरी ऐकायलाच हवे‌. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

असी आहे आपली एसटी .....!