मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

चित्रपट हे मोठे सशक्त माध्यम आहे‌.मनोरंजनाबरोबर चित्रपटातून मोठा संदेश देता येतो, आणि तो देण्यात येतो देखील. निव्वळ टाईमपास फालतू प्रेमकथांचे चित्रपट म्हणून ज्या बॉलिवूडचा उल्लेख होतो ते देखील याला अपवाद नाहीये. बॉलिवूडच्या चित्रपटातून जीवनाविषयक अनेक बाबी आपणास समजतात. याच मालिकेतील  जीवनाबाबत मोठे शिक्षण देणारा एक उत्कृष्ट  चित्रपट म्हणून 25 ऑक्टोबर 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' कडे बघता येईल.
        स्वत:च्या निर्णयाची जवाबदारी स्वत:कडे  कोणत्या प्रकारे घेयची‌.ते निर्णय फसले  तरी त्याबाबत दुसऱ्याला  दोष न देता त्याही स्थितीत स्वतः अपयशाची  जबाबदारी घेत, त्याला हसत हसत सामोरे  कसे जायचे.आयुष्यात छंदाचे महत्त्व काय असते? हे महत्त्वाचे संदेश या चित्रपटातून देण्यात आले आहेत. 
     मनुष्य त्याच्या रोजच्या जगण्यात कितीही व्यस्त असला तरी मनुष्याने त्याच्या छंदासाठी काही वेळ काढला पाहिजे.छंदामुळे वेळ वाया जात नाही, तर व्यक्तीस रोजच्या जगण्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेष बळ मिळते ,हे चित्रपटाचा नायक स्वत:च्या उदाहरणातून दाखवून देतो. चित्रपटाच्या सुरवातीला नायक विविध समस्यांनी ग्रस्त असतो यातून सुटका करण्यासाठी तो शहरातून पळून जातो आत्महत्येचा देखील प्रयत्न अरतौ त्यास अपघाताने नायीका मिळते.नायीका त्यास छंद पुन्हा जोपण्यासाठी प्रवृत्त करते.छंद जोपसल्यामुळे आयुष्यातील त्याचा समस्या सोडवण्याची उर्जा त्यास मिळते आणि तो यशस्वी होते,हे या चित्रपटातून दाखवून देण्यात आले आहे.
तर नायीकेच्या व्यक्ती रेखातून जीवनात आव्हाने स्विकारण्यातील आनंद ,तसेच अपयशाला हसत हसत सामोरे कसे जावे हे दाखवून देण्यात आले आहे
142 मिनीटाचा हा चित्रपट कितीही पाहिला,तरी कंटाळवाणा होत नाही किंबहुना पाहणाऱ्यास नविन उर्मी देतो असा माझा अनुभव आहे,आपण देखील हा अनुभव घेण्यासाठी किमान एकदा तरी हा चित्रपट बघावाच‌

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

असी आहे आपली एसटी .....!