बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेची चढती कमान

                    सिंगापुर येथील सेंटोसा आयलंड येथे बुद्धीबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा सुरु आहे. तिथे चीनचा नागरिक वर्तमान बुद्धिबळ विश्वविजेता डिंग लिरेन  आणि २०२४चा कँडीडेट स्पर्धा विजेता आपल्या सर्वांचा आवडता लाडका सुपर ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्यांत  अटीतटीची लढाई सुरु आहे. हे तूम्हाला एव्हाना माहिती झाले असेलच.भारताचे पहिले ग्रँडमास्टर असणारे भारतीय बुद्धिबळातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले विश्वनाथन आनंद हे या आधी ही स्पर्धा खेळले होते.त्यानंतर सुमारे १२वर्षांनी कोणता तरी भारतीय ही बुद्धिबळातील ही अत्यंत मानाची स्पर्धा खेळतोय.जे आपल्या समस्त भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.अमेरिका आणि रशियाचे बुद्धिबळावर असलेले वर्चस्व मोडीत काढत नार्वे, चीन आणि आपले भारतीय  खेळाडू यात उत्तम कामगिरी करत आहेत आणि त्यात भारतीय खेळाडूंचा मोठा वाटा आहे,ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे‌
                  हा लेख लिहण्यापर्यत स्पर्धेतील ९ सामने झाले आहेत, ज्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या सामन्याचा अपवाद वगळता, अन्य सर्व सामने बरोबरीत सुटले आहेत.ज्यामुळे ही लढत उत्तरोत्तर रंगत जाणार असल्याचे, स्पष्ट होत आहे.सध्या दोन्ही खेळाडुंचे प्रदर्शन बघता ही लढत टायब्रेकमध्येच सुटणार असल्याचे दिसून येत आहे. या आधी सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेश आणि विद्यमान विश्वविजेता डींग लिरेन यांचे सध्याचे खेळातील प्रदर्शन बघता  गुकेश डींग लिरेन यांच्यावर सहजतेने मात करतील असे सांगितले जात होते.मात्र प्रत्यक्ष सामन्यात डिंग यांनी गुकेश यांना कडवी झुंज देण्यास भाग पडल्याचे दिसत आहे. या स्पर्धेत डी.गुकेश अत्यंत आत्मविश्वासाने खेळी करताना दिसत आहेत.जे भारतीय बुद्धीबळपटुंसाठी ,त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामन्य नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
आता वळूया प्रत्यक्ष लढतीकडे. पहिल्या लढतीत डी.‌गुकेश यांनी सुरवात पांढरे मोहरे घेवून केली.दोन्ही खेळाडुंनी सुरवात राजा समोरील आणि वजीरासमोरील प्यादे  चालवून केली.सुरवातीला काहीसा संथ वाटणारा डाव पुढे रंगत गेला त्यामुळे २०१०नंतर पहिल्यांदाच, बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेत पहिल्याच डावात कोणीतरी जिंकले.दुसऱ्या  डावात डी.गुकेश यांची काळी मोहरी होती.पहिल्या फेरीत जिंकल्यामुळे डींग लिरेन यांचा आत्मविश्वास वाढला होता.मात्र त्याचा ताण न घेता काळ्या मोहरे घेवून खेळताना त्यांनी डिंग यांना बरोबरीत डाव सोडवण्यास भाग पडले. २३ चालीपर्यंत रंगलेल्या या सामन्यात एकाच खेळीची तीनदा पुनरावृत्ती झाल्याने डाव बरोबरीत सुटला या डावाची सुरवात दोन्ही खेळांडुंनी राजासमोरील प्यादे दोन घरे चालवून केली. तिसऱ्या लढतीत आश्चर्यकारकरित्या डिंग लिरेन वेळेत खेळी न करु न शकल्याने हारले. या स्पर्धेत सुरवातीच्या २तासात प्रत्येक खेळाडूला ४० खेळी करणे बंधनकारक आहे.मात्र या डवात डिंग हे फक्त ३७ चालीच करू शकले.त्यावेळी सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेश यांच्याकडे १६मिनीटे शिल्लक होती.प्रतीस्पर्ध्याची वेळ संपल्याने समोरच्याला चेकमेट न करता डी.गुकेश जिंकले.डी गुकेश किंवा डिंग लिरेन ज्या स्तरावर बुद्धिबळ खेळतात तिथे या प्रकारे खेळाडू हरणे आश्चचर्यकारक समजले जाते‌. यावेळी गुकेश पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळत होते. तिन सामने झाल्यावर एक दिवसाचा विश्राम होता. एक दिवसाची विश्रांती घेवून झालेल्या या डावात डी गुकेश यांनी पांढरे मोहरे घेवून खेळताना राज्याचा बाजूकडील घोडा राजा शेजारील उंटाच्या उभ्या रेषेत आणून केली त्यास काळे मोहरे घेवून खेळताना डिंग यांनी  वजीरासमोरील प्यादे दोन घरे चालवून उत्तर दिले. यावेळी ४२चाली झाल्या. डावाच्या अखेरीस दोन्ही खेळाडुंकडे एक हत्ती आणि ३प्यादी इतकेच सैन्य शिल्लक होते.अखेरीस दोन्ही खेळाडुंनी  सहमतीने बरोबरी मान्य केली.
पाचव्या फेरीचा सामना फ्रेंच डिफेन्स एक्सेज व्हेरीयशन पद्धतीने खेळवण्यात आला .४२ चालीपर्यंत रंगलेल्या या डावात दोघांनी डावाची सुरवात राजासमोरील प्यादे चालवून केली.पांढरे मोहरे घेवून खेळत असलेल्या सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेश यांनी प्यादे दोन घर तर डींग यांनी घर एक चालवले .डावाच्या अखेरीस डी. गुकेश यांच्याकडे काळ्या घरात फिरु शकणारा उंट आणि ५प्यादी तर डिंग लिरेन यांच्याकडे पांढऱ्या रंगात फिरु शकेल असा उंट आणि चार प्यादी होती.‌सहाव्या आणि सातव्या फेरीत अनुक्रमे डींग लिरेन आणि डी.गुकेश पांढऱ्या मोहऱ्या घेवून खेळले.दोन्ही डाव रंगतदार अवस्थेत पोहोचले होते मात्र दोन्ही डावात बरोबरी झाली. दोन्ही वेळेस पांढरी मोहरे घेवून खेळणाऱ्या खेळाडुंनी वजीरासमोरचे प्यादे दोन घरे चालवून
केली. सहाव्या डी गुकेश यांनी तर सातव्या फेरीत  डींग लिरेन यांनी काळे मोहरे घेवून खेळताना अनुक्रमे राजा समोरील प्यादे खणि राज्याचा बाजूकडील घोडे चालवून आपल्या खेळाची सुरवात केली. तर पांढरी मोहरी घेऊन खेळताना खेळाडुंनी वजीरासमोरील प्यादे आणि राजाच्या बाजूकडील घोडा उंटासमोर आणून केली आठव्या आणि नवव्या फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले.या दोन्ही सामन्यात कोणीतरी जिंकून आघाडी घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत असताना दोन्ही डाव त्याच्या आधी खेळवण्यात आलेल्या अन्य डावप्रमाणे बरोबरीत सुटले. आठव्या फेरीत पांढरी मोहरे घेवून खेळताना डिंग लिरेन यांनी ही तर काळ्या मोहरे घेवून खेळताना डी.गुकेश यांनी अनुक्रमे वजीराच्या बाजूकडील उंटासमोरील प्यादे दोन घरे चालवून आणि राजा समोरील प्यादे दोन घरे चालवून डावाची सुरवात केली.नवव्या डावात पांढरे मोहरे घेवून खेळताना सुपर ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी वजीरासमोरील प्यादे दोन घरे चालवून,तर डिंग लिरेन यांनी राज्याच्या बाजूकडील घोडा राज्याच्या शेजारील उंटासमोर आणून केली.
      सध्या भारत सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगती करत मुसंडी मारत एक एक क्षेत्र पादाक्रांत करत आहे.आताआतापर्यत अमेरिका आणि रशियाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे बुद्धिबळाचे क्षेत्र देखील यातून सुटले नाही जागतिक स्तरावर भारताचा उल्लेख बुद्धिबळातील महासत्ता म्हणून करण्यात येतो आहे.या महासत्तेचा मुकुटमणी म्हणून आपण या स्पर्धेकडे बघायला हवे.अजून या स्पर्धेचे पाच सामने शिल्लक आहेत.त्यात उलटफेर झाला आणि त्यामुळे दुर्देवाने  डी.गुकेश विश्वविजेतेपदाला गवसणी घालू शकले नाहीत तरी या लढतीचे महत्व कमी होत नाही.कारण ही लढत साधीसुधी नाही तर ही लढत आहे विश्वविजेतेपदाची.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

31वर्षे अभिमानाची*

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक