भारत बुद्धिबळातील महासत्ताच !
भारत बुद्धिबळातील महासत्ताच ! होय, भारत बुद्धिबळातील महासत्ता आहे, आणि मी आंधळा देशप्रेमी म्हणून म्हणत नाहीये. बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या फिडे या संघटनेतर्फे एप्रिल २०२५ मधील टॉप १०० खेळाडूंची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्याच्या आधारे मी हे विधान करतोय .
तर मित्रानो फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या फेडरेशन इंटरनॅशलनल डी इचेस या बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या संस्थेमार्फत एप्रिल २०२५ च्या टॉप १०० पुरुष खेळाडूंच्या यादीतील पहिल्या १५ मध्ये ५ खेळाडू भारतीय आहेत. फिडेकडून खेळाडूंचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या खेळाच्या प्रदर्शनावर आधारित काही गुण दिले जातात ज्याला इलो रेटिंग म्हणतात या इलो रेटिंगच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे . या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विद्यमान विश्वविजेते ग्रँडमास्टर डी गुकेश, चवथ्या क्रमांकावर ग्रँडमास्टर अर्जुन इरेगसी सातव्या क्रमांकावर ग्रँडमास्टर आर प्रगण्यानंद अकराव्या क्रमांकावरग्रँडमास्टर अरविद चिदंबारम आणि पंधराव्या क्रमांकावर आहे पाच वेळेचे विश्वविजेते ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद . पुरुष जुनियर गटात पहिल्या पंधरा मध्ये ४ भारतीय आहेत . या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत द्यमान विश्वविजेते ग्रँडमास्टर डी गुकेश, दुसऱ्या क्रमांकावर आहेत ग्रँडमास्टर आर प्रगण्यानंद चवथ्या क्रमांकावर आहेत ग्रँडमास्टर रौनक साधवानी नवव्या क्रमांकावर आहेत ग्रँडमास्टर प्रणव व्ही . महिलांचा करता ज्युनियर गटात पहिल्या क्रमांकावर आहेत इंटरनॅशनल मास्टर नागपूरच्या दिव्या देशमुख, तर नवव्या क्रांकवर आहेत वूमन ग्रँडमास्टर रक्षिता रवी महिला गटात ग्रँडमास्टर कोनेरू कोनेरू हंपी या नवव्या क्रमांकावर आहेत .
या खेरीज प्रत्येक देशातील पहिल्या टॉप १० खेळाडूंचे सरासरी इलो रेटिंग विचारत घेत फिडेकडून देशांची यादी तयार करण्यात येते या यादीत पुरुष गटा आणि महिला गटा या दोन्हीमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे पुरुष गटाच्या विचार करता पहिल्या स्थानी असलेल्या अमेरिकेपेक्षा भारत ५० गुणांनी कमी आहे त्यामुळे आपल्या खेळाडूंचे प्रत्येकी ५ इलो रेटिंग वाढल्यास आपण सहजतेने अमेरिकेला मागे टाकू शकतो सध्या भारतीय खेळाडू ज्या प्रकारचे प्रदर्शन करत आहे ते बघता हे सहज शक्य आहे
एकेकाळी भारतीयांनी शोधलेल्या या खेळात अमेरिका आणि रशियाचा दबदबा असायचा मात्र तो मोडत भारतीय या अस्सल भारतीय खेळात आपला दबदबा निर्माण करत असल्याचे या यादीतून दिसत आहे जे सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिनंदनास्पद आहे हे वेगळे सांगायला नकोच
टिप्पण्या