पोस्ट्स

जून २, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'पोरकी पोरं' मन हेलावून टाकणारे साप्ताहिक सदर

इमेज
मुल ही देवा घरची फुले, रम्य ते बालपण, या सारख्या वाक्यप्रचारातून कोणत्याही व्यक्तीचा लहानपणाचा काळ हा सुखाचा असतो असे सांगितले जाते. मात्र प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच,असतो. तसा या नियमाला देखील आहे,हो काही लहान मुलांचे आयुष्य करपलेले, दु:खाने ग्रस्त, प्रेमाचा अभावातच सरते. लहानपणी जे मिळणे कोणत्याही व्यक्तीचा मुलभुत म्हणा किंवा नैसर्गिक अधिकार असतो,तो त्यांचापासून दुरावला जातो. आई- वडील किंवा जवळचे सांभाळणारे नातेवाईक नसणारी अनथालयातील मुला-मुलींचाच नव्हे,तर आई -वडील जिवंत असलेल्या काही अभागी मुला-मुलींचा आयुष्याचे देखील रखरखीत वाळवंट झालेले असते. हे सर्व आपणास उलगडते, ते दैनिक तरुण भारतच्या पुणे आवृत्तीत दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या आसमंत या साप्ताहिक पुरवणीतील लेखमालिकेद्वारे. नाशिकचे रहिवासी असलेल्या डॉ.तूषार सावरकर यांनी लिहलेल्या पोरकं पोरं या लेखमालिकेद्वारे आपणास या अभागी मुला-मुलींचा आयुष्यातील दाहक वास्तव समजते‌. आपल्यापेक्षा कितीतरी मोठे दु:ख ही मुले-मुली भोगत आहेत.यांचा तूलनेत आपले दू:ख काहीच नाही,या जाणिवेतून आपल्या दु:खाला विनाकारण कुरवाळीत बसण्...