पोस्ट्स

जून ४, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पती-पत्नीच्या विश्वासाची दृढता स्पष्टपणे दाखवून देणारे गाणे

इमेज
दोनच दिवसापुर्वीची गोष्ट आहे. एका वर्तमानपत्रात सध्या समाजात वाढणारे घटस्फोट, आणि त्यातून निर्माण होणारे एकल पालकत्व यावर परखड भाष्य करणारा लेख वाचायला मिळाला.पती-पत्नींचा संघर्षात त्याच्या अपत्यांचे होणाऱ्या मानसिक शोषणाबाबत लेख चिंता व्यक्त केली होती. मी फावल्या वेळात अनेकदा गाणी ऐकतो. त्यामुळे अनेकदा होत काय ? तर एखादी घटना बघितली एखादा लेख वाचला की, आपोआप अरे या प्रसंगाला हे गाणे याला शोभून दिसेल,असे लक्षात येते.याही वेळी अग्गदी तसेच झाले.या लेखाला मला एक गाणे आठवले ते म्हणजे, 'दिस येतील,दिस जातील भोग सरेल, सुख येईल',हे गाणे.१९८२ प्रदर्शित झालेल्या शापीत या चित्रपटातील हे गीत स्मिता पाटील आणि कुलदिप पवार यांच्यावर चित्रीत झाले आहे. या गीताचे गायक आशा भोसले आणि सुरेश वाडकर आहे गीतकार सुधीर मोघे असून संगीतकार    सुधीर फडके आहेत कातकरी समाजाच्या कष्टकरी जिवनाच्या पार्श्वभुमीवर हे गाणे चित्रीत झालेले असले तरी, माझ्यामते हे गाणे कोणत्याही नवरा -बायकोच्या नात्यावर भाष्य करणारे गाणे म्हणून ओळखले जाऊ शकते. ज्यात पत्नी आपल्या पतीस सध्या जरी कष्ट्राचे दिवस असले तरी आपण ए...

समाजसेवा करु इच्छिणाऱ्या व्यक्तीने बघावाच असा चित्रपट ट्रॅफिक सिग्नल'

इमेज
  तरुण भारत,नागपूरच्या पुणे आवृत्तीत सध्या दर रविवारी एक सदर प्रसिद्ध होत आहे, पोरकं पोरे नावाच. विविध कारणांनी बालपणीच्या आनंदाला मुकलेली, बालपणा देगा देवा मुंगी साखरेचा मेवा, या वाक्यप्रचारात सांगितल्याप्रमाणे बालपणीचा मनमुराद आनंद न घेता, करपलेल्या अभागी आयूष्याला सामोरे जाणाऱ्या मुला- मुलींची माहिती या सदरात देण्यात येते‌.याच मालिकेत एक लेख होता, ट्रॅफिक सिग्नलवर आयुष्य व्यतित करणाऱ्या मुला-मुलींच्या आयुष्यातील मन पिळटावून सोडणाऱ्या आयुष्यावर.तसे हा विषय अनेक प्रकार चित्रपटातून दाखवण्यात आला आहे‌. स्लमडॉग मिलेनीयम या चित्रपटातील  मधील बराच मोठा भाग यांच्या आयुष्यावर भाष्य करतो. असो. मी एस.पी .कॉलेजमध्ये शिकत असताना मोठ्या प्रमाणात चित्रपट बघितले त्या अनुभवानुसार सांगतोय,ही समस्या जर कोणत्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडली असेल तर ती मधुर भांडारकर  दिग्दर्शित आणि निर्मित ' ट्रॅफिक सिग्नल या चित्रप मधुर भांडारकर दिग्दर्शित ट्रॅफिक सिग्नल हा चित्रपटात. तसेच मधूर भांडारकर यांचे सर्वच चित्रपट जेल, पेज थ्री, कार्पोरेट, मै माधूरी दिक्षीत बनना चाहतू हूं,  सामाजिक समस्...