फक्त अनावश्यक सवलती आवरा !
प्रति देवेंद्रजी फडणवीसजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेशी जय महाराष्ट्र साहेब, आपल्या आदेशान्वये, 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळला, नागरिकांच्या बोलीभाषेत एसटीला आपण निधी देणार नसल्याचे जाहिर केले.राज्याची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याने निधी देत नसल्याचे कारण आपण यावेळी दिले. एसटीने स्वत:हुन उत्पनाचे स्त्रोत शोधावेत असी आपली भुमिका देखील आपण त्यावेळी जाहिर केली. मुळात एसटीला राज्य सरकारकडे निधी का मागावा लागतो,याचा विचार कराल का, साहेब. राजकीय स्वार्थासाठी नेत्यांकडून विविध सवलती जाहिर केल्या जातात. या सवलतीमुळे एसटीला कमी किमतीत तिकीट संबंधित प्रवाश्यास द्यावे लागते.नियमित प्रवाशी वर्गाला जेव्हढा वाहतूक खर्च येतो,तितकाच या सवलती मिळवणाऱ्या प्रवाश्याकडून येतो.मात्र त्या बदल्यात रक्कम मिळत नाही.ती कमी मिळते साहेब.आपले एसटी महामंडळ तब्बल ५२ प्रकारच्या तिकीटात सवलती देते. देशातील कोणतेही राज्य परिवहन महामंडळ इतक्या मोठ्या प्रमाणात तिकिटात सवलत देत नाही.ज्या आपण देतो साहेब. लोककल्याणकारी राज्यात गोरगरीब जनतेला सम्मानाचे जगणे जगता ...