पोस्ट्स

जून ८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ......

इमेज
 माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत .ते आम्हा तरुणांच्या मोबाईलप्रेमावर सातत्याने  बोलत असतात ते म्हणतात, 'अरे तुमच्या हातात जेवहा बघावा तेव्हा मोबाईल मोबाईल आणि फक्त मोबाईल अरे जरा वाचत जा'' वाचनाचे महत्व सांगताना या आजोंबाच्या हक्काचे पेटंट म्हणता येईल वाक्य असतेच असते किंबहुना जर त्यांनी वाचनाचे महत्व सांगताना त्यांनी ते वाक्य बोलले नाही तर त्यांना आठवण करून द्यावी का ? की तुम्ही तुमचे नेहमीचे वाक्य बोलला नाहीत विसरले की काय ? तर आजोबांचे ते हुकुमी वाक्य मुळातील समर्थ रामदास स्वामींचे आहे.  ते म्हणजे ................  प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ...... ते नेहमी सांगतात अरे  मी नाही पण समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे म्हणून तरी वाचा  मात्र हे आजोबा हे सांगताना एक गोष्ट विसरतात किंबहुना त्यांच्या मुद्दा जोरकसपाने पुढे यावा म्हणून त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात असे म्हणा हवेतर तो म्हणजे मुळात समर्थ रामदास स्वामींना हा उपदेश करण्याची गरज का वाटावी ? माझ्यामते  लोकांची मुळातच वाचनाची प्रवृत्ती नसावी.आज मोबाइलमुले वाचन कमी झालंय असे म्हणतात त्यावेळी दुसरे...

मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा ..

इमेज
  मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा .. शीर्षक वाचून गडबडलात का ? आता हा काय सांगतोय मोबाईलला कोणी केले बळीचा बकरा .. मुळात मोबाईल हे एक यंत्र आहे तो काही सजीव प्राणी नाही त्यामुळे त्याला मुळातच बळीचा बकरा कसे केले जाऊ शकते असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर जरा थांबा आणि मी काय म्हणतोय (म्हणजे लिहितोय हो...! ) हे जरा समजून घ्या  तर वाचक मित्र मैत्रिणींनो आजची पिढी काही वाचतच नाही जेव्हा बघावे तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल आणि मोबाईल असे आपण अनेकदा ऐकतो वाचतो.  आजच्या पिढीच्या वाचायला न आवडण्याचे पाप सरळ मोबाईलवर ढकलून दिले जाते जसे काही मोबाइलमुळेच वाचन संपले म्हूणनच  म्हंटले मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा  मला मान्य आहे की, मोबाईलमुळे वाचन काहीसे कमीच झाले आहे.मात्र वाचन कमी होण्यामागचे तेच एक कारण नाहीये. आपण जर इतिहासात बघितले तर  कारणे काहीही असो  वाचन मुळातच कमीच होते, असे दिसते.  किंबहुना त्यामुळेच समर्थ रामदास स्वामींना,  ... प्रसंगी अखंडित वंचित जावे असा उपदेश करावा लागला. जरा विचार करा जर रामदास स्वामींच्या काळात वाचन म...