पोस्ट्स

जून १८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

''मना त्वाची पूर्वसंचित रे केले,मना त्वाची पूर्वसंचित रे केले,

इमेज
 'जनीं सर्वसूखीं असा कोण आहे ।  विचारें मना तूंचि शोधुनि पाहे ॥  मना त्वाची पूर्वसंचित रे केले !  तया सारिखे भोगणे प्राप्त झाले'!!  समर्थ रामदास स्वामी यांच्या सुप्रसिद्ध अश्या मनाच्या श्लोकातील ११ व्या  क्रमांकाचा श्लोक . या जगात पूर्णपणे सुखी असा कोणीही नाही, हे तू स्वतःच मनाला विचार करून शोधून पाहिले पाहिले पाहिजे. हे मना, तू स्वतःच पूर्वजन्मी जशी कर्मे केली आहेत, त्यानुसारच तुला फळे व सुख-दुःख भोगावी लागत आहेत अशा या श्लोकाचा अर्थ .सध्याच्या दुष्काळ सदृश्य स्थितीचा विचार करता श्लोकाचा खालचा अर्धा भाग विशेष महत्ताचा आहे.  मना त्वाची पूर्वसंचित रे केले! तया सारिखे भोगणे प्राप्त झाले'! गेल्या काही वर्षात आपण सामूहिकरित्या दाखवलेली  बेफिकीरीची शिक्षा आपण सध्या पाणी टंचाईच्या माध्यमातून अनुभवत आहोत    गेल्या ४ ते ५ वर्षात जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या अनेक घटना घडल्या,  काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आले. काही ठिकाणी न भूतो न भविष्यती अशी थंडीची लाट आली. उष्णतेने गेल्या कित्येक वर्षाचे उच्चांक मोडले .आपला भारत त्यातह...