पोस्ट्स

मे ३०, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समस्या सारखीच फक्त माध्यमात बदल

इमेज
कालच मला व्हाट्सअप वर एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये आजची तरुण पिढी  झेन झी ही इंटरनेटच्या आहारी गेल्यामुळे कसे देशाचे वाटोळे होत आहे, यावर साधरणत:सत्तरीच्या वयाचे आजोबा चिंता करत होते. तो व्हिडीओ बघत असताना, मला का जाणे कुणास ठाउक, माझ्या नाशिकच्या कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवायला लागल्या. 'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी । करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥' कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध 'स्वातंत्र्य देवतीची विनवणी' या कवितेतील या ओळी व्हिडीओशी देखील मेळ खात होत्या. आजोबा तरुणाईच्या व्यसनाविषयी बोलत होते, आणि कवीवर्य कुसुमाग्रज देखील आजपासून २९ वर्षापुर्वी याच तरुणाईला वेळ वाया घालण्यापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्न करत होते.तशी ती संपूर्ण कविताच विचार करण्यासारखी आहे.गेल्या ३०वर्षात परिस्थिती किती सुधारली (किंबहुना बिघडली)याचा विचार करणारा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.मात्र तूर्तास आपण तो विषय बाजुला ठेवूया.असो तर कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या वेळच्या निरर्थक गोष्ट्रीत तरुणाईने वेळ वाया घालवू नये.तरुणाईने करमणूकीला कमी म...