पोस्ट्स

जून ६, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवी आयुष्यातील नात्यांचे महत्त्व उलगडणारा चित्रपट '“अमृत

इमेज
  आज २०२६ साली सुद्धा गावाच्या साधारणतः मध्यभागी असलेल्या महादेवाच्या मंदिराला केंद्र मानून एक दीड  किलोमीटरचे वर्तुळ काढले तर संपूर्ण गाव येऊ शकेल अश्या धार्मिक महत्त्व असलेल्या त्रंबकेश्वर या शहरातील एका ब्राह्मण कुटूंबियातील धोंडोपंत फाळके (दादासाहेब फाळके ) यांनी ११३ वर्षांपूर्वी भारतात आणलेले चित्रपट हे तंत्र मोठे विलक्षण आहे. मानवी आयुष्यतील रंजकता, दाहकता यांचे प्रभावीपणे सादर करणे. समाजाला उपयोगी पडेल असा संदेश समोरच्याला आपणास उपदेश केला आहे याची थेट जाणीव न होता समजेल अश्या पद्धतीने देण्यासह व्यक्तीचे मनोरंजन करण्यात चित्रपटाचा हात कोणी धरू शकणार नाही, असे मला वाटतंय.   संगीत नाटक, एकपात्री नाटक,  दोन अंकी नाटक, फिरता रंगमंच असलेले नाटक तमासातील वगनाट्य आणि यासारखे कोणतेही प्रकार घेतले तरी त्यास चित्रपटाची सर येणे निव्वळ  अशक्यच .  आपल्या भारताला अनेक उत्तोमत्तम आशयघन चित्रपटाची मोठी परंपरा आहे . याच अभिंनदनास्पद वाटचालीतील अनेक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे अमृत  “अमृत हा १९८६ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी आहे....