मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा ..
मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा .. शीर्षक वाचून गडबडलात का ? आता हा काय सांगतोय मोबाईलला कोणी केले बळीचा बकरा .. मुळात मोबाईल हे एक यंत्र आहे तो काही सजीव प्राणी नाही त्यामुळे त्याला मुळातच बळीचा बकरा कसे केले जाऊ शकते असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर जरा थांबा आणि मी काय म्हणतोय (म्हणजे लिहितोय हो...! ) हे जरा समजून घ्या तर वाचक मित्र मैत्रिणींनो आजची पिढी काही वाचतच नाही जेव्हा बघावे तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल आणि मोबाईल असे आपण अनेकदा ऐकतो वाचतो. आजच्या पिढीच्या वाचायला न आवडण्याचे पाप सरळ मोबाईलवर ढकलून दिले जाते जसे काही मोबाइलमुळेच वाचन संपले म्हूणनच म्हंटले मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा
मला मान्य आहे की, मोबाईलमुळे वाचन काहीसे कमीच झाले आहे.मात्र वाचन कमी होण्यामागचे तेच एक कारण नाहीये. आपण जर इतिहासात बघितले तर कारणे काहीही असो वाचन मुळातच कमीच होते, असे दिसते. किंबहुना त्यामुळेच समर्थ रामदास स्वामींना, ... प्रसंगी अखंडित वंचित जावे असा उपदेश करावा लागला. जरा विचार करा जर रामदास स्वामींच्या काळात वाचन मोठ्या प्रमाणात असते तर त्यांनी प्रसांगी अखंडित वंचित जावे हा उपदेश केला असता का ? मोबाईलमुळे मुळातच कमी असणारी गोष्ट अजूनच रोडावली असे म्हणा .मात्र वाचन संपण्याचे पाप संपूर्णपणे मोबाईलच्या पारड्यात टाकणे योग्य नाही असे मला वाटतंय
समर्थ रामदास स्वामींच्या काळातही लोकांना वाचनाची सवय लावावी लागत होती. म्हणजेच वाचनाचा अभाव हा नव्या युगाचा दोष नसून, मानवी स्वभावाशी निगडित एक सातत्यपूर्ण प्रवृत्ती आहे, असे आपण म्हणू शकतो ना ? आपल्या मनुष्य प्राण्याचा मुळातच स्वभाव असा आहे की , आपल्याला सहजसोपे, त्वरित आनंद देणारे आणि कमी कष्टात मिळणारे पर्याय अधिक छान किंवा आताच्या मॉडर्न मराठीत सांगायचे झाल्यास प्लेझंट वाटतात. वाचन करायला मात्र एकाग्रता, संयम आणि सातत्य हे आवश्यक आहे जर वाचनात सातत्य नसेंरल तर आपण जे वाचायला घेतलंय ते पुस्तक पूर्ण होणे काहीसे अवघडं होईल ना ? वाचलेले समजून घेयला एकाग्रता
देखील आवश्यकच कारण नाहीतरी डोळ्यासमसमोरून काही चिन्हे गेली असेच म्हणावे लागेल .तसेच या दोन्ही गोष्टी मिळण्यासाठी संयम सुद्धा आवश्यकच कारण पुस्तक वाचायला काही वेळ लागणारच तो पर्यंत कंटाळा न येत सुरु केलेले पूर्ण करायला आपल्याकडे हवा संयम . या तीन गोष्टींच्या कंटाळ्यामुळे अनेकजण वाचनाकडे दुर्लक्ष करतात. पूर्वीच्या काळातही लोकांच्या आयुष्यात शेती, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांना प्राधान्य होते; त्यामुळे अभ्यासपूर्ण वाचनासाठी वेळ आणि प्रेरणा कमी पडत असे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी सारख्या संतांनी आणि विचारवंतांनी वाचनाचे महत्त्व समाजावर ठसवण्याचा प्रयत्न केला.याचे एक ठळक उदाहरण म्हणजे पूर्वीच्या काळातील कीर्तन, प्रवचन किंवा भागवत सप्ताह. या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असे. लोक कथा आणि अभंग मन लावून ऐकत; परंतु त्या मागील ग्रंथ जसे की दासबोध, भागवत, रामायण वैगेरे स्वतः हुन वाचणाऱ्यांची संख्या कमीच होती. ऐकणे” लोकांना अधिक सोपे वाटत होते,
समर्थ रामदास स्वामींचा संदेश केवळ पुस्तक वाचण्यापुरता मर्यादित नाही, तर तो ज्ञानार्जनाची सततची प्रक्रिया दर्शवतो. “अखंडीत वाचीत जावे” यामागे सातत्य, जिज्ञासा आणि आत्मविकासाची भावना आहे. केवळ ज्ञान
उपलब्ध असणे पुरेसे नसते; ते आत्मसात करण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न आवश्यक असतात. वाचन विचारांना परिपक्व करते, निर्णयक्षमता वाढवते आणि व्यक्तिमत्त्व घडवते.पूर्वी वाचनाच्या ऐवजी कीर्तन प्रवचन याला हजारेंच्या लावत आज त्याच्या ऐवजी मोबाईल मध्ये डोके खुपसून बसतात हाच तो काय फरक . माध्यमे बदलली माणसाची मूलभूत प्रवृत्ती फारशी बदललेली नाही.हेच खरे .त्यामुळे वाचनाच्या कमी प्रमाणाला मोबाईला जवाबदार धरणे म्हणजे मोबाईलला बळीचा बकरा करणे हेच ना ?




टिप्पण्या