फक्त अनावश्यक सवलती आवरा !
प्रति
देवेंद्रजी फडणवीसजी
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
यांच्या सेवेशी
जय महाराष्ट्र
साहेब, आपल्या आदेशान्वये, 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळला, नागरिकांच्या बोलीभाषेत एसटीला आपण निधी देणार नसल्याचे जाहिर केले.राज्याची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याने निधी देत नसल्याचे कारण आपण यावेळी दिले. एसटीने स्वत:हुन उत्पनाचे स्त्रोत शोधावेत असी आपली भुमिका देखील आपण त्यावेळी जाहिर केली.
मुळात एसटीला राज्य सरकारकडे निधी का मागावा लागतो,याचा विचार कराल का, साहेब. राजकीय स्वार्थासाठी नेत्यांकडून विविध सवलती जाहिर केल्या जातात. या सवलतीमुळे एसटीला कमी किमतीत तिकीट संबंधित प्रवाश्यास द्यावे लागते.नियमित प्रवाशी वर्गाला जेव्हढा वाहतूक खर्च येतो,तितकाच या सवलती मिळवणाऱ्या प्रवाश्याकडून येतो.मात्र त्या बदल्यात रक्कम मिळत नाही.ती कमी मिळते साहेब.आपले एसटी महामंडळ तब्बल५२ प्रकारच्या तिकीटात सवलती देते. देशातील कोणतेही राज्य परिवहन महामंडळ इतक्या मोठ्या प्रमाणात तिकिटात सवलत देत नाही.ज्या आपण देतो साहेब.
लोककल्याणकारी राज्यात गोरगरीब जनतेला सम्मानाचे जगणे जगता यावे यासाठी काही सवलती देणे हे न्याय सुसंगतच आहे.यात वाद नाहीच.पण या सवलतींची संख्या अमर्याद असू नसे,इतकी माफक अपेक्षा ठेवायला कोणाचीच अडकाठी नसावी.साहेब एसटी महामंडळाला आता या सवलतींचे ओझे सांभाळणे कठीण होत चालले आहे.या सवलतींमुळे एसटीचा श्वास कोंडला गेला आहे. तो मोकळा न झाल्यास एसटी गतप्राण होणार,हे शाळकरी मुलगा देखील ओळखू शकतो.
साहेब वांद्यापासून चांद्यापर्यत पसरलेल्या या महाराष्ट्रात असे कित्येक पालक आहेत जे आपल्या मुलीला केवळ एसटीची सोय आहे,म्हणूनच ंशिक्षणाला पाठवतात.देव न करो पण दुर्देवाने एसटी बंद पडलीच तर या मुलींचे शिक्षण देखील बंद पडेल,आणि शिक्षण बंद पडलेल्या मुलींचा लग्नाबाबत काय करण्यात येते ,हे आपणाला वेगळे सांगायला नकोच.
साहेब, आपण विरोधी पक्षात असताना एसटीचे राज्य सरकारमध्ये पुर्णत: विलीनीकरण करणार असल्याचे सांगत होतात.आता आपणाकडे पुर्ण बहुमत आहे. तरी एसटीचे पुर्णत: विलिनीकरण करावे,म्हणजे असी निधीची वेगळी मागणीच करावी लागणार नाही.जर ते शक्य नसेल तर किमान एसटीच्या या योजनांबाबत कडक भुमिका तरी घ्यावी इतकेच माझे आपणास सांगणे आहे.आणि आपण ती ग्याल अशा आशा आहे
कळावे
एक एसटी बसवर प्रेम असणारा अस्सल प्रेमी



टिप्पण्या