इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?

मा‌.प्रताप सरनाईक, साहेब
परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज 

 सप्रेम जय  महाराष्ट्र 

साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्यातील एसटी बसचे आर्थिक उत्पन वाढावे, आणि प्रवाश्यांना सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी एसटी बस स्टँडपासून २०० मीटरच्या हद्दीत खासगी वाहतूक होणार नाही, हे बघण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे आपण नुकतेच जाहिर केले. एसटीची स्थिती सुधारण्यासाठी आपण उपाययोजना करत आहात,हे बघून आनंद वाटला. आज आपल्या महाराष्ट्रात अनेक पालक आपल्या मुलीला फक्त कमी तिकीट आहे, म्हणून घरापासून दूर असलेल्या गावात शिक्षणासाठी पाठवत आहेत.त्यांना शिक्षणाचा प्रवाहात टिकण्यासाठी एसटी टिकणे आवश्यक आहे. साहेब, मी  एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेच्या मार्फत महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया या ४ जिल्ह्याचा अपवाद वगळता आपली महाराष्ट्राची एसटी जाते अस्या राज्याच्या काना कोपऱ्यात आणि राज्याबाहेर अहमदाबाद,सुरत, इंदोर, बेळगाव, बंगळूरू,पणजी, वापी आदी ठिकाणी  फिरलोय. या फिरण्यात मला काही बाबी निर्दसनास आल्या आहेत.ज्या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहेत,असे वाटल्याने त्या आपणापर्यत पोहोचवण्यासाठी हे अनावृत् पत्रलेखन

साहेब, आपल्या महाराष्ट्र एसटीला खासगी बसवाहतूकदारांपेक्षा जास्त धोका कोणता असेल, तर तो अन्य राज्यातील एसटी बसेसचा.आपण एकवेळ खासगी बसवाहतूकदारांना २०० काय २,००० मीटर दूर नेऊ,पण या अन्य राज्यातील एसटी बसेसचे काय करणार ?गुजरात राज्याचा बसेस आपल्या राज्यात पार परभणीपर्यत येतात हो साहेब‌.पुर्वी जसी अमुक आजाराचा रूग्ण दाखवा १,००० रुपये मिळवा,असी योजना असायची ,त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील असा तालूका दाखवा,जिथे इतर राज्यातील एसटी बस येत नाही १,००० रूपये मिळवा असी योजना जाहिर करण्यासारखी स्थिती आहे.गोवा सारखे आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याएव्हढे राज्य पार लातूरपर्यत सेवा पुरवते. 

साहेब, पुणे शहरातील स्वारगेट झाले, नाशिकमधील महामार्ग बसस्थानक झाले,या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेकदा आपल्या महाराष्ट्राचा बसेस कमी आणि कर्नाटक, गुजरात राज्यातील बसेसची संख्या जास्त असी स्थिती असते.

साहेब,  या इतर राज्यातील बसेस आपल्या महाराष्ट्रात किती संख्येने येतात? आपल्या किती बसेस त्यांचा राज्यात जातात? याचा आढावा घेतला तर आपल्या महाराष्ट्राच्या तूलनेत या इतर राज्याचा बसेस जास्त संख्येने आपल्या राज्यात येतात असे दिसते.

आणि एक अत्यंत महत्त्वाची बाब सांगून आपली रजा घेतो साहेब. या बसेस आपल्या एसटी बसच्या शेजारी त्यांची बस लावून आपले प्रवाशी पळवतायं. आपल्या बसेसच्या तूलनेत त्यांचा प्रामुख्याने कर्नाटकच्या बसेस अधिक आरामदायी आणि स्वच्छ असल्याने आपले प्रवाशी सुद्वा या बसेसला प्राधान्य देतात.
माझ्यामते  पुणे, नाशिक या सारखी मोठी शहरे किंवा ज्या ठिकाणी बसस्टँडची मोठी जागा आहे,त्या ठिकाणी अन्य राज्ये बसस्टँड ही सेवा उभारून या इतर राज्यातील बसेसना तेथूनच प्रवासी घेण्याची सक्ती करण्यात यावी.आपल्या महामंडळाच्या बसेस शेजारी त्यांचा बसेस लावण्याची अनुमती मुळीच देऊ नये.
असे केले तरच आपल्या एसटीला नफ्यात आणण्याचे अभियान यशस्वी होईल.फक्त खासगी बसवाहतूकदारांना रोखले आणि या अन्य राज्यातील एसटी बसेसला मोकळे रान सोडले तर लहान हत्तीला अटकाव आणि मोठ्या हत्तीला शेतात मोकळीक असी स्थिती उत्पन होईल.जे कदापी योग्य ठरणार नाही.
साहेब पत्रात आधी सांगितले तसे एसटीचा खरा फायदा हा गरीब जनतेला होतो.त्यांचासाठी एसटी बस टिकलीच पाहिजे टिकलीच पाहिजे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास